शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
2
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
3
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
4
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
5
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
6
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
7
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
8
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
9
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
10
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
11
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
12
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
13
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
14
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
15
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
16
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
17
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
18
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
19
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
20
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी

आशियाडसाठी दोन आठवड्यांत सज्ज होऊ शकते- मीराबाई चानू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:15 AM

दुखापत गंभीर नसल्याचा खुलासा; तयारीसाठी पुरेसा कालावधी

नवी दिल्ली : पाठीच्या दुखण्यामुळे आशियाडमधील समावेशावर प्रश्नचिन्ह लागल्यानंतरही विश्व चॅम्पियन आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती भारोत्तोलक सेखोम मीराबाई चानू हिने या स्पर्धेसाठी दोन आठवड्यांत सज्ज होण्याचा निर्धार व्यक्त केला. पाठीचे दुखणे तितके गंभीर नसून तयारीसाठी केवळ दोन आठवड्यांची तयारी पुरेशी असल्याचे मीराबाईचे मत आहे. ती ४८ किलो वजन गटात आव्हान सादर करते. सध्या ती पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण केंद्रात कमरेच्या वरच्या भागाचा सराव करीत आहे. पुढील दोन आठवड्यांत मणिपूरच्या २३ वर्षांच्या मीराबाईच्या खेळण्याविषयी निर्णय घेण्यात येईल.२५ मे रोजी तिच्या पाठीत दुखणे उमळले होते. देशभरातील अनेक डॉक्टर दुखण्यावर तोडगा शोधण्यात अपयशी ठरले. दिल्ली, मुंबईसह अनेक ठिकाणी तिने उपचार केले; पण रिपोर्ट नॉर्मल आल्याने दुखण्याचे कारण कळले नव्हते. एक्सरे मध्येही काहीच निष्पन्न होऊ शकले नाही.इंडोनेशियात १८ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या आशियाडला एक महिन्यापेक्षा कमी वेळ असून, मीराबाईला मात्र दोन आठवड्यांत सज्ज होण्याचा विश्वास वाटतो. व्यायाम सुरू असल्याने दुखणे कमी झाल्याचे लक्षात आले आहे. दोन-तीन आठवड्यांत मी वजन उचलू शकेन, असे मीराबाई म्हणाली. नोव्हेंबर महिन्यात मीराबाईने विश्व चॅम्पियनशिपमध्ये २२ वर्षांत भारतासाठी पहिले सुवर्ण जिंकले. तिने १९४ किलो वजन उचलले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही राष्टÑीय विक्रमासह १९६ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते. (वृत्तसंस्था)‘‘आशियाडमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक आहे. भारोत्तोलनात चीन, जपान, थायलंड, कझाखस्तानसारखे देश आघाडीवर असल्याने कडवी स्पर्धा असेल.’’- मीराबाई चानू, भारोत्तोलक.

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानूSportsक्रीडा