शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

मॅक्युलम तळपला

By admin | Updated: February 21, 2016 00:47 IST

आपल्या कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळत असलेला न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने केवळ ५४ चेंडूंना सामोरे जाताना शतक ठोकून कसोटी क्रिकेटमधील सर्वांत वेगवान शतक

ख्राईस्टचर्च : आपल्या कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळत असलेला न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने केवळ ५४ चेंडूंना सामोरे जाताना शतक ठोकून कसोटी क्रिकेटमधील सर्वांत वेगवान शतक ठोकण्याचा विंडीजचा दिग्गज फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स व पाकिस्तानचा मिस्बाह-उल्-हक यांचा विक्रम मोडला. आपला १०१वा आणि कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळत असलेला न्यूझीलंडचा कर्णधार मॅक्युलम याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात शनिवारी पहिल्या दिवशी केवळ ५४ चेंडूंमध्ये शतकी खेळी साकारली. त्याने ७९ चेंडूंना सामोरे जाताना २१ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने १४५ धावांची विक्रमी खेळी केली. रिचर्ड्सने इंग्लंडविरुद्ध सेंट जोन्स येथे १९८५-८६मध्ये ५६ चेंडूंमध्ये शतक आणि मिस्बाहने २०१४-१५मध्ये अबुधाबी येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध ५६ चेंडूंमध्ये केलेला शतकी खेळी साकारण्याचा विक्रम मॅक्युलमने शनिवारी मोडला.दुसऱ्या कसोटी सामन्यात उपाहारानंतर मॅक्युलमने केवळ ५४ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्याच्या शतकी खेळीत ६ षटकार व २१ चौकारांचा समावेश आहे. दरम्यान, मॅक्युलमने कसोटी क्रिकेट कारकिर्दीत सर्वांत अधिक षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवला. हा विक्रम यापूर्वी आॅस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता. गिलख्रिस्टने ९६ कसोटी सामन्यांत १०० षटकार ठोकले, तर मॅक्युलमने १०१ कसोटी सामन्यांत १०६ षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे.मॅक्युलमने सर रिचर्ड्स याचा विक्रम मोडल्यामुळे निराशा व्यक्त केली. मॅक्युलम म्हणाला, ‘‘सर रिचर्ड्स क्रिकेटमध्ये माझा आदर्श आहे. ते सार्वकालिक पसंतीचे खेळाडू आहेत. मी माझ्या फलंदाजीचा पूर्ण आनंद घेतला; पण रिचर्ड्स यांचा विक्रम मोडल्यामुळे निराश झालो.’’ मॅक्युलम ज्या वेळी फलंदाजीसाठी आला, त्या वेळी न्यूझीलंड संघ ३ बाद ३२ असा संघर्ष करीत होता. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मॅक्युलमने संस्मरणीय खेळी केल्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात ३७० धावांची दमदार मजल मारता आली. (वृत्तसंस्था)धावफलक : पहिला डाव : न्यूझीलंड सर्व बाद ३७०; मार्टिन गुप्तील १८, ब्रँडन मॅक्युलम १४५, कोरे अँडरसन ७२, बी. जे. वॅटलिंग ५८, गोलंदाजी : जोश हेजलवूड २/९८, जेम्स पॅटिन्सन २/८१, नॅथन लायन ३/६१. आॅस्ट्रेलिया : १ बाद ५७ : डेव्हिड वॉर्नर १२, उस्मान ख्वाजा खेळत आहे १८, जो बर्न्स खेळत आहे २७. गोलंदाजी ट्रेंट बोल्ट १/१८.मॅक्युलमचे विक्रमी शतककर्णधार ब्रँडन मॅक्युलमने आपल्या कारकिर्दीतील अखेरची लढत संस्मरणीय ठरवली. शनिवारपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मॅक्युलमने १४५ धावांची खेळी करताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान शतक झळकावण्याचा पराक्रम केला. न्यूझीलंडने पहिल्या डावात ३७० धावांची दमदार मजल मारली.