शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नवदुर्गा! पद्म पुरस्कारांसाठी मेरी कोमसह नऊ महिला खेळाडूंची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 13:27 IST

सहा विश्वविजेतेपद नावावर असलेल्या बॉक्सर मेरी कोमची पद्म विभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

मुंबई : सहा विश्वविजेतेपद नावावर असलेल्या बॉक्सर मेरी कोमची पद्म विभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणारी मेरी ही पहिलीच महिला खेळाडू आहे. पद्मभूषण पुरस्कारासाठी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या पी व्ही सिंधूच्या नावाची, तर कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, हॉकीपटू राणी रामपाल, माजी नेमबाज सुमा शिरूर आणि गिर्यारोहक ताशी व नुंगशी मलिक या बहिणींची यांची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली. मेरी कोमने 2003, 2006, 2009 आणि 2013 मध्ये अनुक्रमे  अर्जुन पुरस्कार, पद्मश्री,  राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. तिने सहा वेळा जगज्जेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला आहे. लाईट फ्लायवेट गटात मेरीने एआयबीबीएच्या मानांकनाच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळवले होते. याशिवाय 2014 मध्ये दक्षिण कोरियातील  इंचॉन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरण्याचा बहुमान मेरीने संपादन केला आहे.

याच यशाची पुरावृत्ती मेरीने 2018 मधील राष्ट्रकुल  क्रीडा सापर्धेतही केली होती. 2012 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र  ठरविलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर होती. या ऑलिम्पिकमध्ये मेरीने फ्लायवेट (51 किलो गट) लढतीत कांस्यपदक मिळवले होते. 2016 मध्ये भारताचे सन्मानीय राष्ट्रपती यांनी मेरीची संसदेच्या वरिष्ठ सभागृहात, राज्यसभेकरता मेरीची  खासदार  म्हणून नियुक्ती केली होती.

नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूनं जेतेपद पटकावले. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक नावावर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत.

टॅग्स :Mary Komमेरी कोमPV Sindhuपी. व्ही. सिंधू