शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सोने-हिऱ्यांनी झाकलेली असते मेवेदरची बॉडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 02:42 IST

लोकप्रिय अमेरिकन बॉक्सर फ्लॉयड मेवेदर याची सोशल मीडियावरील लक्झुरिअस लाइफस्टाइल पाहून लोकांच्या मनात हाच विचार येईल की, आपले अच्छे दिन कधी येतील?

मुंबई : लोकप्रिय अमेरिकन बॉक्सर फ्लॉयड मेवेदर याची सोशल मीडियावरील लक्झुरिअस लाइफस्टाइल पाहून लोकांच्या मनात हाच विचार येईल की, आपले अच्छे दिन कधी येतील? ४१ वर्षीय फ्लॉयड सोने आणि किमती हिऱ्यांचे चालते-फिरते दुकान आहे. म्हणजे त्याच्या हातापासून ते गळ्यापर्यंत केवळ सोने आणि हिरेच बघायला मिळतात.११ फेब्रुवारीला फ्लॉयडने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यातून त्याने त्याची श्रीमंती दाखविली आहे. हा व्हिडीओ जगभरातील ९ कोटी लोकांना पाहिला. यात दिसतेय की, फ्लॉयड एका सोन्याच्या मगमधून ड्रिंक घेतोय आणि त्याच्याकडची महागडी ज्वेलरीसुद्धा तो दाखवितो आहे. इतकेच नाही, तर त्याच्या पायाखाली त्याने लाखो डॉलर्स ठेवले आहेत.फ्लॉयड हा नेहमीच त्याच्याकडे भरपूर कॅश ठेवतो. मग तो जेवत असो, प्रवास करत असो वा बेडवर झोपलेला असो. तो स्ट्रिप क्लबमध्ये जाऊन रोज लाखो डॉलर्सही खर्च करून येतो. माहितीनुसार, आॅगस्ट, २०१७ मध्ये फ्लॉयडने सर्वात महागड्या फाइटमध्ये मिक्स्ड मार्शल आटर््सचा सुपरस्टार कोनोर मॅकग्रेगोरला मात देऊन ५०वा विजय नोंदविला होता. या विजयानंतर त्याला ६५० कोटी रुपए मिळाले होते. तेच २०१५ मध्ये फ्लॉयडने एका फाइटमधून तब्बल २०० मिलियन डॉलर मिळविले होते.फ्लॉयडला अल्टिमेट फायटिंगचा किंग मानला जातो. त्याच्याकडे इतका पैसा आहे की, कधी-कधी बँकेतून पैसे आणण्यासाठी त्याला ट्रकचा वापर करावा लागतो. माहितीनुसार, त्याची एकूण संपत्ती ५६० मिलियन डॉलर म्हणजे ४ हजार कोटी रुपये इतकी आहे.