शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

मेरीकोमची अंतिम फेरीत धडक; लवलीनाचे कांस्यवर समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 05:08 IST

सुपरस्टार एम. सी. मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्या विश्वविजेतेपदासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकताना विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिला ५-० ने पराभूत केले.

नवी दिल्ली : सुपरस्टार एम. सी. मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्या विश्वविजेतेपदासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकताना विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिला ५-० ने पराभूत केले. त्याचवेळी भारताची युवा बॉक्सर लवलीना बोरगोहेन (६९ किलो) हीला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले.आपले सहावे सुवर्ण आणि चॅम्पियनशीपमधील सातवे पदक मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मेरीकोमने आपला अनुभव पणाला लावत रणनितीनुसार खेळ केला. या जोरावर मेरीकोमने उपांत्य फेरीत किम ह्यांग हिला सर्वसमंतीने झालेल्या निर्णयाद्वारे ५ -० असे पराभूत केले.मेरीकोमने गेल्या वर्षी आशियाई चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत किम ह्यांग हिलाच पराभूत केले होते. ती खूपच आक्रमक खेळ करत होती. मणिपूरच्या बॉक्सरने आपल्या अचूक आणि वेगवान पंचच्या जोरावर तिन्ही पंचांकडून २९-२८, ३०-२७, ३०-२७, ३०-२७, ३०-२७ असे गुण मिळवले.आता २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम लढतीत युक्रेनच्या हन्ना ओखोटा हिच्याविरुद्ध मेरीकोम विश्वविक्रमी सुवर्ण पदक मिळवण्यासाठी भिडेल. ओखोटाने जापानच्या मडोका वाडा हीला ५-० ने पराभूत केले.मेरीकोमने नुकत्याच पोलंडमध्ये झालेल्या सिलेसियान बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये हन्ना ओखोटा हिलाच पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.३५ वर्षीय मेरीकोमचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. तिच्या प्रत्येक पंचवर प्रेक्षकांनी टाळ््या वाजवून तीचा उत्साह वाढवला.दुसरीकडे, २१ वर्षीय लवलीना हिला वेल्टरवेट उपांत्य फेरीत चीनी तायपेची बॉक्सर चेन निएन चीनकडून ०-४ असा पराभव पत्करावा लागला. रेफ्रीने तिसºया फेरीत लवलिनाचा एक गुण कमी केला. लवलिना या आधी चेन निएनविरुद्ध झालेल्या सामन्यातही पराभूत झाली होती. चेन निएनचा सामना आता चीनच्याच दुसºया मानांकित होंग गू सोबत होईल. तिने जर्मनीच्या नादिने अपेट्सला ४-१ ने पराभूत केले. (वृत्तसंस्था)सावध सुरुवातीनंतर मेरीचा आक्रमक पवित्रामेरीकोम पहिल्या फेरीत काहीशा अधिक सावधनतेने खेळत होती. मात्र नंतर तिने उत्तर कोरियाच्या बॉक्सरला फारशी संधी दिली नाही.दुसºया फेरीत मेरीने आपल्या रणनितीप्रमाणे खेळ केला. त्यामुळे तिने सहजतेने गुण मिळवले. तिसºया फेरीत मेरीकोम अधिक आक्रमक झाली आणि तिने गुण मिळवण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. या दरम्यान तिने उजव्या हाताने सरळ किम ह्यांगच्या चेहºयावरच जोरदार ठोसे मारले.मी ह्यांगला व्हिएतनाममध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पराभूत केले होते. तरीही मी थोडी सतर्क होते. कारण कोणतीही बॉक्सर कधीही बाजी पलटवू शकते. प्रत्येक लढतीतून काही ना काही शिकायला मिळते. आम्ही लढतीचे आकलन केले होते. रक्षण आणि आक्रमणाची योग्य रणनिती तयार केली होती. अंतिम सामन्यासाठी मी पुन्हा एकदा माझ्या खेळाचे आकलन करेल आणि देशवासियांपुढे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून देशाला गौरवान्वित करेल.- मेरीकोम

टॅग्स :Mary Komमेरी कोमboxingबॉक्सिंग