शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

..अन् मेरीने अवघ्या चार तासांत दोन किलो वजन कमी केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:00 AM

सिलिसियन स्पर्धेत केली झुंजार कामगिरी

नवी दिल्ली : चार तासात दोन किलो वजन कमी करणे, हे काहीसे अशक्य वाटत असले, तरी सुपरमॉम मेरी कोम हिने पोलंडमधील लढतीच्या आधी ही किमया करून दाखवली.नुकताच पोलंडच्या गिलवाइसमध्ये झालेल्या १३ व्या सिलिसियन बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोम जेव्हा तेथे पोहचली तेव्हा तिचे वजन दोन किलोने जास्त होते. तसेच तिच्याकडे चार तासांचा वेळ होता. तिने हे आव्हान पूर्ण केले आणि सोबतच स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी सुवर्ण पदकाची कमाई केली.पाच वेळची विश्व चॅम्पियन मेरी कोम म्हणाली की, ‘आम्ही सकाळी तीनच्या सुमारास तेथे पोहचलो. वजन मोजण्यास साडेसात वाजता सुरुवात होणार होती. मला ४८ किलो गटात खेळायचे होते. आणि माझे वजन दोन किलोने जास्त होते. माझ्याकडे वजन कमी करण्यासाठी चार तास जास्त होते. अन्यथा मी अपात्र ठरले असते. त्यामुळे मी सलग एक तास दोरी वरच्या उड्या मारल्या. त्यानंतर वजन कमी करण्यास सुरुवात केली.’ती पुढे म्हणाली, ‘आमच्यासाठी एक चांगली बाब होती की आम्ही ज्या विमानातून प्रवास करत होतो. ते विमान जवळपास पूर्ण रिकामे होते. त्यामुळे आम्हाला आराम करता आला. जास्त थकवा झाला नाही. नाहीतर मी स्पर्धेत सहभागी होऊ शकले नसते.’ दोन महिन्यांनी मेरीकोम वयाची ३६ वर्ष पूर्ण करणार असून तिने हे स्पष्ट केले की, ती २०२० आॅलिम्पिक पर्यंत आपला खेळ सुरू ठेवेल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Mary Komमेरी कोमboxingबॉक्सिंग