शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

डोपिंग नंतर मारियाचे दमदार पुनरागमन, दोन्ही सेटमध्ये पिछाडीवरुन जबरदस्त विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 20:05 IST

रशियाच्या मारिया शारापोव्हाने तिआनजीन ओपन स्पर्धा जिंकताना महिला टेनिसच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय विजयांपैकी एक विजय नोंदवला.

तिआनजीन- रशियाच्या मारिया शारापोव्हाने तिआनजीन ओपन स्पर्धा जिंकताना महिला टेनिसच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय विजयांपैकी एक विजय नोंदवला. पहिल्या सेटमध्ये 1-4 आणि दुसऱ्या सेटमध्ये 1-5 अशी मागे पडल्यावर, एवढेच नाही तर तब्बल तीन पॉईंट गमावल्यावर अखेर चौथ्या पॉईंटवर तिने अंतिम सामना जिंकला. बेलारुसच्या एरिना साबालेंकाचा कडवा संघर्ष दोन तास पाच मिनिटात तिने 7-5, 7-6( 10-8) असा मोडून काढला.  

एवढी कलाटणी महिला टेनिस इतिहासात क्वचितच कुणी अंतिम फेरीच्या सामन्याला दिली असेल. डोपिंग नंतर पुन्हा खेळायला लागल्यापासून मारियाचे हे पहिलेच विजेतेपद आहे. 

या नाट्यमय सामन्यात माजी नंबर वन आणि पाच ग्रँड चॅम्पियन स्पर्धा विजेत्या  मारियाने  तरुण एरिना सबालेंका हिच्यावर 7-5, 7-6 (10-8) असा विजय मिळवला. अर्थात मारियासारख्या कसलेल्या खेळाडूला एवढी टक्कर देणाऱ्या एरिनाचेही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. जागतिक क्रमवारीत 102 व्या स्थानी असलेल्या एरिनाने संपूर्ण सामन्यात मारियाला एक क्षणसुध्दा निवांत बसू दिले नाही. 19 वर्षीय एरिना प्रथमच डब्ल्यूटीए स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचली होती. 

2015 च्या इटालियन ओपननंतरचे  मारियाचे हे पहिलेच तर एकुण 36 वे अजिंक्यपद आहे. तब्बल अडीच वर्षानंतर तिने एखादी स्पर्धा जिंकली आहे.  यंदा एप्रिलमधील पुनरागमनानंतर सातव्या स्पर्धेत प्रथमच तिच्या हाती विजेतेपदाची ट्रॉफी आली आहे.

 बेलारुसच्या एरिनासोबतच्या या भन्नाट सामन्यात 11 सर्विस ब्रेक बघायला मिळाले. या सामन्याच्या पहिल्या सेटमधील सातवा गेम तब्बल नऊ मिनिटे रंगला. 1-4 अशी मागे पडल्यावर प्रशिक्षकाच्या सल्ल्याने बॉडी सर्व्ह तंत्र वापरणार्या मारियाने हा गेम जिंकला आणि एरिनाची सर्व्हिस भेदली. त्यानंतर संतापलेल्या एरिनाने तिसऱ्यांदा सर्विस गमावली. दुसऱ्या सेटमध्येही 1-5 पिछाडीवरुन मारियाने तीन ब्रेक मिळवत मुसंडी मारली.

या विजेतेपदामुळे मारिया शारापोव्हा जागतिक क्रमवारीत 86 व्या स्थानावरुन 57 व्या स्थानी झेपावणार आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा