शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनजीतने केला टॉप्समध्ये समावेश करण्याचा आग्रह;आशियाई क्रीडा स्पर्धेत घेतली होती सुवर्णधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 00:58 IST

‘२०२० आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेची तयारी करता यावी यासाठी टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) माझा समावेश करावा,’ असा आग्रह आशियाई क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मनजीत सिंगने केला आहे.

नवी दिल्ली : ‘२०२० आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेची तयारी करता यावी यासाठी टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) माझा समावेश करावा,’ असा आग्रह आशियाई क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मनजीत सिंगने केला आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाºया मनजीतकडे सध्या नोकरी नाही. निकाल देत नसल्याचे कारण सांगताना ओएनजीसीने मार्च २0१६ मध्ये त्याचा करार वाढविण्यास नकार दिला होता. प्रतिकूल परिस्थितीतही मनजितने सेनेचे प्रशिक्षक अमरीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू ठेवला आणि त्यानंतर त्याला राष्ट्रीय शिबिरासाठी बोलाविण्यात आले होते.मनजीत म्हणाला की, ‘मी रिझल्ट देत नसल्याचे कारण देत ओएनजीसीने माझा करार वाढविण्यास नकार दिला. त्याआधी मला मदतनिधी मिळत होती; परंतु आता मी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. मंत्रालय माझी कामगिरी आणि माझ्या समस्येकडे लक्ष देईल, अशी आशा वाटते. माझ्याजवळ एकही प्रायोजक नाही. त्यामुळे क्रीडा मंत्रालय मला टॉप्समध्ये स्थान देईल, अशी मला आशा आहे.’तो पुढे म्हणाला की, ‘मी पुढील वर्षी आशिया आणि विश्व चॅम्पियनशिप या दोन्ही स्पर्धांत भरीव कामगिरी करू इच्छितो. त्यानंतर आगामी २०२० टोकियो आॅलिम्पिकच्या सरावासाठी मला आर्थिक मदत हवी आहे. क्रीडा मंत्रालय मला मदत करील, अशी मला आशा वाटते.’ (वृत्तसंस्था)1) हरियाणातील जिंद जिल्ह्याच्या उझाना गाव येथे वास्तव्यास असलेल्या २९ वर्षीय मनजीत ओएनजीसीसह करार संपुष्टात आला तेव्हा, खेळ सोडण्याच्या मन:स्थितीत होता.2) तो म्हणाला, ‘मी खूप निराश झालो होतो. मी शेतकरी कुटुंबातून असून माझा परिवार सरावासाठी मला मोठी रक्कम देऊ शकत नसल्याने एक वेळेस अ‍ॅथलेटिक्स सोडून द्यावे, असे मनात आले होते.’

टॅग्स :Manjeet Singhमनजित सिंग