शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मालविका बनसोड, लक्ष्य सोन यांच्याकडे भारतीय बॅडमिंटन संघाचे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 07:32 IST

Badminton: मालविका बनसोड आणि इंडिया ओपन बॅडमिंटनचा विजेता लक्ष्य सोन हे मलेशिया येथे १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित शाह आलम आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील.

नवी दिल्ली : सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेची उपविजेती नागपूरची २० वर्षांची युवा खेळाडू मालविका बनसोड आणि इंडिया ओपन बॅडमिंटनचा विजेता लक्ष्य सोन हे मलेशिया येथे १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित शाह आलम आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील.भारतीय बॅडमिंटन संघटनेने(बीएआय) मागच्या महिन्यात हैदराबाद आणि चेन्नईत खेळल्या गेलेल्या अ. भा. स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे  संघ जाहीर केला. खेळाडूंची निवड दोन स्पर्धांमधील रॅंकिंग गुणांच्या आधारे झाली. अनेक अनुभवी खेळाडू कोरोनाबाधित असल्याने युवा खेळाडूंना स्वत:ची ओळख निर्माण करता यावी यासाठी राखीव फळीला संधी देण्यात येत असल्याची माहिती बीएआय महासचिव अजय सिंघानिया यांनी दिली.

भारतीय संघपुरुष : एकेरी- लक्ष्य सेन, मिथुन मंजुनाथ, किरण जॉर्ज, रघू एम. पुरुष दुहेरी : पीएस रवी कृष्ण - उदयकुमार शंकरप्रसाद, अम्सकरुनन हरिहरन- रुबन कुमार, डिंगकू सिंग -कोंथोजम, मंजित सिंग-खहवॅराकपम.महिला : एकेरी- मालविका बनसोड, आकर्षी कश्यप, अश्मिता चालिहा, तारा शाह. महिला दुहेरी : सिमरन सिंघी - खुशी गुप्ता, व्ही. नीला -अरुबाला, आरती सारा सुनील- रीज महरीन.

उन्नती हुड्डा अंतिम फेरीत, मालविका बनसोड पराभूत         कटक : उन्नती हुड्डा हिने शानदार कामगिरीच्या बळावर फॉर्ममध्ये असलेल्या मालविका बनसोडचा उपांत्य फेरीत पराभव करीत ओडिशा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. शनिवारी झालेल्या सामन्यात १४ वर्षांच्या उन्नतीने जेतेपदाची प्रबळ दावेदार मालविकावर ५० मिनिटात २४-२२, २४-२२ ने विजय साजरा केला.  मालविकाने अलीकडे इंडिया ओपनमध्ये सायना नेहवालला नमविले. त्यानंतर सय्यद मोदी बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात पी.व्ही. सिंधूकडून  ती पराभूत झाली होती. येथे मालविकाने ज्युनियर गटात विश्व क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या तसनीम मीरचा पराभव केला होता. दुसऱ्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत १६३ व्या स्थानावर असलेल्या तोष्णिवालने अश्मिता चालिहाचा २१-१९, १०-२१, २१-१७ ने पराभव केला.

टॅग्स :BadmintonBadminton