मकरंद दासरीला सुवर्ण
By admin | Updated: December 23, 2015 02:13 IST
मकरंद दासरीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण
मकरंद दासरीला सुवर्ण
मकरंद दासरीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णसोलापूर: आंतरराष्ट्रीय फुटबॉल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने भुतान फुटबॉल टेनिस महासंघाच्या वतीने भुतान येथील फुव्हेन्टशॉलींग शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल टेनिस स्पर्धेत दुहेरीत सोलापूरच्या वालचंद महाविद्यालयातील मकरंद दासरी याने सुवर्णपदक पटकावल़ेमकरंद दासरी हा गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र फुटबॉल टेनिस असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा फुटबॉल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने प्रशिक्षकामार्फत प्रशिक्षण घेत आह़े तसेच त्याने अनेक राष्ट्रीय फुटबॉल टेनिस प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभाग नोंदविला आह़े त्याला राज्य फुटबॉल संघटनेचे चेअरमन अरुण शर्मा, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, उपाध्यक्ष मुकुंद जाधव, मनीष सुरवसे, सचिव भीमराव बाळगे, इक्बाल शेख, शिवकुमार पाटील, निशांत अंबरशे?ी यांचे मार्गदर्शन लाभल़े (क्रीडा प्रतिनिधी)