शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

सर्वोत्तम खेळ करणे प्रमुख लक्ष्य

By admin | Updated: April 6, 2016 04:37 IST

टीम इंडियाचा प्रशिक्षक परदेशी असावा की देशी हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. माझे काम संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आहे

मुंबई : टीम इंडियाचा प्रशिक्षक परदेशी असावा की देशी हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. माझे काम संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आहे आणि मी त्यासाठी कायम प्रयत्न करीत राहणार. प्रशिक्षक नेमणे हे बीसीसीआयचे काम आहे. त्यांनी नेमून दिलेल्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली मी खेळणार, असे मत भारताचा आघाडीचा फलंदाज सुरेश रैना याने व्यक्त केले.लोअर परेल येथे झालेल्या एका कार्यक्रमात रैनाने आपले मत व्यक्त केले. नुकताच झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत संघाने चांगली कामगिरी केल्याचे सांगतानाच त्याने विजेत्या वेस्ट इंडिज संघाचेही अभिनंदन केले. आगामी आयपीएलमध्ये रैना गुजरात लायन्सचे नेतृत्त्व करणार आहे. याविषयी तो म्हणाला, ‘‘आयपीएलचे यंदाचे सत्र माझ्यासाठी आव्हानात्मक असेल. आठवर्ष एकाच संघात राहिल्यानंतर आता दुसऱ्या संघातून खेळताना जुन्या घरातून नव्या घरी राहण्यास जाण्यासारखे आहे. अगोदरच्या संघातील सिनियर खेळाडूंकडून मी खूप काही शिकलो असून त्याचा मला निश्चितच चांगला फायदा होईल.’’स्पर्धेत पहिल्यांदाच महेंद्रसिंग धोनी विरुद्ध खेळण्याचा अनुभव कसा असेल, या प्रश्नावर रैना गंमतीत म्हणाला, ‘‘आधीच्या संघातील बहुतेक खेळाडू माझ्या संघात असून आम्ही धोनीविरुध्द नाही, तर धोनी आमच्या विरुद्ध खेळेल.’’ तसेच, ‘‘आम्ही केवळ धोनी विरुद्ध रणनिती आखलेली नाही. स्पर्धेतील सर्वच संघ तगडे असून प्रत्येकाविरुद्ध वेगळी रणनिती आखावी लागेल. ही स्पर्धा नवोदितांसाठी सुवर्णसंधी असून प्रत्येकासाठीच आव्हानात्मक असेल,’’ असेही रैना म्हणाला.आपल्या गुजरात संघाविषयी रैनाने सांगितले, ‘‘आमच्या संघात अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. विशेष म्हणजे ड्वेन ब्रावो संघात असल्याचा आनंद आहे. (क्रीडा प्रतिनिधी)