शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2023 : पदक हुकलं पण मन जिंकलं! महाराष्ट्राच्या पठ्ठ्याची आशियाई क्रीडा स्पर्धेत 'लांब' उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 19:04 IST

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय शिलेदारांनी विक्रमी पदकांची कमाई केली.

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय शिलेदारांनी विक्रमी पदकांची कमाई केली. काही खेळाडूंनी कडवी झुंज दिली पण त्यांना पदक जिंकण्यात अपयश आलं. नाशिकच्या सर्वेश कुशारेला देखील पदक जिंकण्यात अपयश आलं असलं तर या मराठमोळ्या पठ्ठ्याने चौथ्या स्थानावर झेप घेतली. खरं तर सर्वेशला थोड्या फरकामुळे कांस्य पदकापासून दूर राहावे लागले. पुरूषांच्या उंडी उडी स्पर्धेत सर्वेशने २.२६ मीटर उडी मारली. 

दरम्यान, कतारच्या BARSHIM Mutazने २.३५ मीटरसह सुवर्ण पदकाला गवसणी घातली. याशिवाय कोरियाच्या WOO Sanghyeokने २.३३ मीटरसह रौप्य आणि जपानच्या SHINNO Tomohiroने २.२९ मीटरसह कांस्य पदक पटकावले. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिलेदाराला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सर्वेश कुशारे हा मूळचा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आहे. नाशिकपासून ३० किमी अंतरावर असलेल्या देवरगाव गावच्या सर्वेशने आशियाई स्पर्धेपर्यंत झेप घेतली. 

भारताची विक्रमी कामगिरी भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ८१ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली. आज नीरज चोप्राने भालाफेकीतील त्याचे जेतेपद कायम राखले. त्याने ८८.८८ मीटर लांब (सर्वोत्तम कामगिरी) भालाफेकून सुवर्णपदक निश्चित केले. भारताच्या किशोर कुमार जेनाने ८७.५४ मीटरसह रौप्यपदकावर नाव कोरले. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत भारताने ३ मिनिटे २७.८५ सेकंदासह रौप्यपदक जिंकले. त्यानंतर पुरुषांनी ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.  

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Nashikनाशिक