शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

महाराष्ट्राच्या राहुल आवारेने मारले मैदान, भारतीय मल्लांना ३ सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 4:16 AM

महाराष्ट्राचा प्रतिभावान मल्ल राहुल आवारेने युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या शिखर संघटनेतर्फे आयोजित कुस्ती मानांकन मालिकेत मैदान मारताना शनिवारी सुवर्णपदकाला गवसणी घातली.

पुणे : महाराष्ट्राचा प्रतिभावान मल्ल राहुल आवारेने युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या शिखर संघटनेतर्फे आयोजित कुस्ती मानांकन मालिकेत मैदान मारताना शनिवारी सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याच्यासह सीमा आणि मंजूकुमारी या महिला मल्लांनीही भारताला सुवर्णपदक जिंकून दिले.तुर्कस्थानची राजधानी इस्तंबूल येथे ही स्पर्धा सुरू आहे. राहुलने ६१ किलो वजनगटामध्ये बाजी मारली. अंतिम फेरीत त्याने यजमान तुर्कस्थानचा मल्ल मुनीर अख्तास याच्यावर ४-१ असे सहजपणे वर्चस्व गाजविले. या मानांकन मालिकेतील राहुलचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. याच वयोगटात महाराष्ट्राच्याच उत्कर्ष काळे याला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.सीमा हिने ५० किलो, तर मंजूकुमारी हिने ५९ किलो वजनगटामध्ये अव्वल स्थान पटकावीत या स्पर्धेतील भारतीय संघाची सुवर्णपदक संख्या तीनवर नेऊन ठेवली. ५० किलो गटाच्या अंतिम फेरीत सीमाने रशियाच्या व्हॅलेरिया चेपसाराकोवा हिची झुंज ३-२ अशी निसटत्या फरकाने मोडून काढली. मंजूने ५९ किलो गटाच्या निर्णायक लढतीत बेलारूसच्या कॅत्सिरायना यानुशकेविच हिचा १३-२ असा सहजपणे धुव्वा उडविला.>या स्पर्धेमुळे नवा आत्मविश्वास मिळाला आहे. यात खेळणारे खेळाडू मोठ्या स्पर्धांमध्ये प्रतिस्पर्धी असतात. त्यांना नमवून या मालिकेतील पहिले सुवर्ण जिंकल्यामुळे मी स्वत:च्या कामगिरीवर समाधानी आहे. आता जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे. - राहुल आवारे