शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा : अमोल, समीर, सुधीर यांची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 15:14 IST

मुंबईच्या अमोल शिंदेने रायगडच्या ऐझाज मुझावरला २५-६, २५-३ असे सरळ दोन गेममध्ये नमवित दुसरी फेरी गाठली.

मुंबई : शिवाजी पार्क जिमखाना आयोजित अकराव्या महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात दोन गेम रंगलेल्या लढतीत मुंबईच्या अमोल शिंदेने रायगडच्या ऐझाज मुझावरला २५-६, २५-३ असे सरळ दोन गेममध्ये नमवित दुसरी फेरी गाठली. ठाण्याच्या समीर अन्सारीने एकतर्फी झालल्या लढतीत मुंबई-उपनगरच्या विनायक अदितचा २५-०, २५-० असा फाडशा पाडत वर्चस्व सिद्ध करत दुसरी फेरी गाठली. पुण्याच्या सुधीर महापुरेने सरळ दोन गेममध्ये मुंबई-उपनगरच्या मझहर मुझावरचा २५-३, २५-२ असा धुव्वा उडवित पुढची फेरी गाठली. मुंबईच्या रघुनाथ वाघपंजेने दोन गेम रंगलेल्या लढतीत मुंबई-उपनगरच्या अरुण चंदेलियाचा २५-१९, २५-१४ असा पराभव करुन कूच केली. ही प्रतिष्ठेची राज्य गुणांकन स्पर्धा मुंबई डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या विद्यमाने शिवाजी पार्क जिमखाना येथे अत्यंत नीट आणि नेटक्या पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला विक्रमी ४५० खेळाडूंचा सहभाग लाभला आहे. मुंबईच्या सलमान खानने ठाण्याच्या रॉबर्ट  स्वामीचा दोन गेममध्ये २५-०, २५-१ असा फाडशा पाडत विजयी आगेकूच केली. ठाण्याच्या महेश शेट्येने मुंबईच्या भास्कर गवसचा २५-५, २५-० असा सरळ दोन गेममध्ये निष्प्रभ करत दुसरी फेरी गाठली. दुसऱ्या एका दोन गेम रंगलेल्या लढतीत मुंबईच्या फैजान अन्सारीने मुंबईच्याच मनोज पाटीलचा २५-१, २५-६ असे नमवित कूच केली. दुसऱ्या एका सामन्यात मुंबई-उपनगरच्या शहीद नवाझने पालघरच्या ज्युनिअर खेळाडू अविराज अखाडेचे २५-१४, २५-३ असे सरळ दोन गेममध्ये त्याचे आव्हान संपुष्टात आणले. ह्या प्रतिष्ठित कॅरम स्पर्धेचा उद्‌घाटन समारंभ प्रमुख पाहुणे व जिम्नॅस्टिक्सच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या, मार्गदर्शन व खेळाडू श्रीमती वर्षा उपाध्ये यांच्या हस्ते कॅरम बोर्डवर खेळून संपन्न झाला.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र