शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तसं झाल्यास आरक्षणाचा प्रश्न निश्चित सुटेल", शरद पवारांचे मराठा आरक्षणाबद्दल केंद्राकडे बोट
2
"आता तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रात बुडाली का?; दोन समाजात आगी लावून...!" संजय राऊतांचा फडणीसांवर थेट हल्ला
3
मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन; राज ठाकरेंनी एका वाक्यातच दिलं उत्तर, कुणाला धरलं धारेवर?
4
Video: NEET ची तयारी करणारी विद्यार्थिती कोचिंग सेंटरच्या छतावर चढली अन्...
5
दहशतवाद्यांना घुसखोरीत मदत करणारा समंदर चाचा उर्फ ह्यूमन GPS चकमकीत ठार
6
अमित शाह-एकनाथ शिंदे यांच्यात 'महाचर्चा'; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तासभर बैठक
7
अमेरिका 'या' देशावर हल्ला करण्याच्या तयारीत? दररोज पाठवतायेत सैन्य, आतापर्यंत ७ युद्धनौका तैनात
8
फडणवीसांचं वजन मोदींकडे, शिंदेंचं वजन शाह यांच्याकडे; संविधान बदलायला हरकत काय? संजय राऊतांचा सवाल!
9
Gauri Avahan 2025: गौरी आवाहनापासून विसर्जनापर्यंत सविस्तर माहिती; पूजा साहित्य आणि मुहूर्तही!
10
८ आधार, ८ लायसन्स, १६ मतदार कार्ड आणि... व्यक्तीकडे सापडला बनावट कागदपत्रांचा खजिना  
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: न्या. शिंदे, विभागीय आयुक्त मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार
12
"BMC आयुक्त कोण आहे, नाव लिहून ठेवा; कंट्रोल मुख्यमंत्र्यांकडेच आहे..."; मनोज जरांगेंचा इशारा
13
शरद पवारांचा 'सुसाईड बॉम्ब' म्हणून जरांगेंकडे पाहतात; भाजपा आमदार संजय केनेकरांचं खळबळजनक विधान
14
Maratha Morcha Mumbai video: "मला मारलं, यांच्याकडे हत्यारं"; जखमी असल्याचे नाटक, मराठा आंदोलनात गोंधळ घालणाऱ्याला पकडले
15
आंदोलने, धरणे अन् मोर्चे आझाद मैदानावरच का? मंत्रालय, सचिवालयापर्यंत परवानगी नाही; श्रेय उच्च न्यायालयाला
16
RCB कडून बंगळुरु चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत
17
राजीनाम्यानंतर जगदीप धनखड यांचा पेन्शनसाठी अर्ज, कोण कोणत्या सुविधा मिळणार?
18
Delhi Murder Video: भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, सेवेकऱ्याला जीव जाईपर्यंत मारलं; दिल्ली हादरली
19
अमेरिकेचे नवं पाऊल...भारताला बसू शकतो मोठा झटका; १.६ अब्ज डॉलर्स गुंतवणूक धोक्यात
20
'शोले'मधून सचिन पिळगावकरांचा 'हा' सीन केलेला कट, पण फोटो आला समोर; अभिनेत्याला वाटलेलं वाईट

महाराष्ट्राचा पुरुष संघ बाद फेरीत

By admin | Updated: November 26, 2015 02:26 IST

यजमान महाराष्ट्राने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना ४९व्या राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष गटात बाद फेरी गाठली आहे

मुंबई : यजमान महाराष्ट्राने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना ४९व्या राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष गटात बाद फेरी गाठली आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या महिला संघानेदेखील विजय मिळवताना स्पर्धेच्या बाद फेरीतील आपली जागा निश्चित केली आहे.सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य खो-खो संघटना आणि सोलापूर हौशी खो-खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या स्पर्धेत बलाढ्य भारतीय रेल्वे आणि कर्नाटकच्याही दोन्ही संघांनी बाद फेरी गाठली असल्याने स्पर्धेतील चुरस वाढली आहे. महाराष्ट्राने पुरुष गटामध्ये दिल्ली संघाविरुद्ध दणदणीत विजय मिळवताना त्यांचा एक डाव व ७ गुणांनी १५-८ असा धुव्वा उडवला. सुरुवातीपासूनच एकतर्फी झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या आक्रमक धडाक्यापुढे दिल्लीकरांचा निभाव लागला नाही. कर्णधार युवराज जाधवने जबरदस्त अष्टपैलू खेळ करताना ३.२० मिनिटांचे दमदार संरक्षण आणि ३ बळी घेतले. प्रतीक वाईकर यानेही शानदार अष्टपैलू खेळ करताना ३ मिनिटांचे संरक्षण आणि २ बळी घेत दिल्लीच्या आक्रमणातली हवा काढली. तसेच मिलिंद चावरेकरने आक्रमणात ५ गडी मारताना दिल्लीच्या पराभवावर शिक्का मारला.दुसऱ्या बाजूला बलाढ्य गतविजेत्या रेल्वेने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना ओडिसा संघाचा २२-६ असा फडशा पाडला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात रेल्वेने ओडिसाला जणू खो-खोचे धडेच दिले. पी आनंदकुमार व रंजन शेट्टी यांनी प्रत्येकी ६ बळी घेताना ओडिसावर जबरदस्त दबाव टाकले. तर मनोज पवार आणि अमित पाटील यांनी शानदार अष्टपैलू खेळ करताना संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.महिला गटात महाराष्ट्रासह मध्य भारत, विदर्भ, तामिळनाडू, कर्नाटक, कोल्हापूर, आंध्र प्रदेश, प. बंगाल, गुजरात आदी संघांनीही कूच केली.