शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दोहा जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा: भारतीय संघाकडून पदकाची आशा कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 06:55 IST

नीरज चोप्रा आणि हिमा दास दुखापतग्रस्त

दोहा : नीरज चोप्रा आणि हिमा दास हे दोन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने त्यांच्याविना शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपदमध्ये उतरणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून पदकांची आशा कमीच आहे. या खेळाडूंनी अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला, तरी देशासाठी ते मोठे यश ठरेल.भालाफेकपटू नीरज चोप्रा ढोपराच्या दुखापतीतून सावरल्यानंतर तो सरावात व्यस्त आहे. हिमाने युरोपात जवळपास चार महिने सराव केला. यादरम्यान तिने काही शर्यती जिंकल्या. जागतिक स्पर्धेच्या संघात स्थान मिळविल्यानंतर तिच्या कंबरेची दुखापत उफाळल्यानेमाघार घेतली आहे. हिमाच्या दुखापतीच्या व्यवस्थापनावरून भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाला टीकेचा सामनाही करावा लागला.जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नीरज फिट असता, तर त्याच्याकडून पदकाची अपेक्षा करता आली असती. हिमा गेल्या दोन महिन्यांपासून ४०० मीटरच्या आवडीच्या प्रकारात ५०.७९ सेकंद या सर्वोत्कृष्ट वेळेपर्यंत पोहोचू शकली नाही.भारतीयांमधून अंतिम फेरी कोण गाठेल, हे सांगणे कठीण आहे. अ‍ॅथलेटिक्स महासंघाला मात्र ४ बाय ४०० मीटर रिले व मिश्र ४ बाय ४०० मीटर रिले या संघांकडून पदकाची आशा आहे. मिश्र ४ बाय ४०० मीटर रिलेचा समावेश प्रथमच जागतिक स्पर्धेत झाला आहे. भारतीयांकडून पदकाची अपेक्षा बाळगणे अतिशयोक्ती ठरेल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. २००३ च्या विश्व स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्ज हिने एकमेव कांस्य पदक जिंकले होते. २०१७ ला लंडन येथे भालाफेकीत देविंदरसिंग कंग अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला होता. (वृत्तसंस्था)अनस रिलेत धावणार भारताच्या २७ सदस्यांच्या संघात१३ खेळाडू केवळ रिले शर्यतीसाठी आहेत. धरुन अय्यास्वामी वैयक्तिक ४०० मीटर अडथळा शर्यतीत आव्हान सादर करेल. त्याचवेळी राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनस याला वैयक्तिक ४०० मीटरमध्ये उतरविण्यात येणार नाही. तो ४ बाय ४०० मीटर रिले संघातून अंतिम फेरीसाठी प्रयत्न करेल.