शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

लुईसची खेळी सर्वोत्तम खेळींपैकी एक

By admin | Updated: July 12, 2017 00:40 IST

पूर्ण क्षमता असलेला विंडीज संघ विश्व क्रिकेटसाठी लाभदायक आहे आणि भारताविरुद्धच्या एकमेव टी-२० लढतीत त्याची प्रचिती आली.

सौरभ गांगुली लिहितात...पूर्ण क्षमता असलेला विंडीज संघ विश्व क्रिकेटसाठी लाभदायक आहे आणि भारताविरुद्धच्या एकमेव टी-२० लढतीत त्याची प्रचिती आली. इर्विन लुईसने आक्रमक क्रिकेट खेळताना चाहत्यांना रिझविले व संघाला विजयही मिळवून दिला. त्याच्या खेळात कॅरेबियन शैली दिसून आली. यापूर्वी खेळल्या गेलेल्या टी-२० लढतीत भारतीय संघाच्या मार्गात लुईस अडथळा ठरला होता आणि रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यातही विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ त्याच्यापुढे सपशेल अपयशी ठरला. त्याने दोन संधी दिल्या असल्या तरी, त्यामुळे त्याने केलेल्या खेळीचे महत्त्व कमी होणार नाही. त्याच्या आक्रमक खेळीला लगाम घालण्यासाठी भारतीय संघाकडे काही पर्याय होते. संघाला २० षटकांत १९० धावांचे आव्हान पार करून देण्यासाठी विंडीजच्या एका फलंदाजाकडून अशाप्रकारची खेळी आवश्यक होती. भारतीय संघाची आक्रमक सुरुवात बघता संघाने दोनशे धावांचा पल्ला पार करणे अपेक्षित होते. पण कोहली व धवन बाद झाल्यानंतर यजमान संघाने पुनरागमन केले. पदार्पणाची लढत खेळणाऱ्या ऋषभ पंतसाठी ही खडतर लढत होती. दिनेश कार्तिक व पंत यांनी धावगती वाढविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना विंडीजच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवता आले नाही. कार्तिक बाद झाल्यानंतर धोनी व कुलदीप यादव यांना विशेष छाप सोडता आली नाही. त्यामुळे भारताच्या धावगतीवर प्रभाव पडला. फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर १९० धावांचे लक्ष्य आव्हानात्मक होते. भारतीय वेगवान गोलंदाज विंडीजच्या आघाडीच्या फळीला रोखण्यात कितपत यशस्वी ठरतात, यावर सर्व काही अवलंबून होते. गेलने संयमी खेळी केली, पण लुईसने मात्र आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने एकाही गोलंदाजाला सेट होण्याची संधी दिली नाही. लुईसने गुडलेंग्थवरील चेंडूला पुढे सरसावत सीमारेषा दाखविली तर आखूड टप्प्याच्या चेंडूंना त्याने मिडविकेट सीमारेषेचा मार्ग दाखविला. अशा प्रकारची आक्रमक खेळी करताना दैवाची साथ मिळणे आवश्यक असते आणि भारतीय क्षेत्ररक्षकांनी त्याला दोन संधी बहाल केल्या. या युवा खेळाडूने सुरुवातीपासून आक्रमक खेळी करीत वर्चस्व गाजवले. कुलदीप यादवचा काहीअंशी अपवाद वगळता भारतीय फिरकीपटूंना छाप सोडता आली नाही. शमीला लयच गवसली नाही, त्यामुळे लुईसला थोपविणे शक्य झाले नाही. टी-२० लढतीत १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ९ गडी राखून विजय मिळविण्याची कामगिरी प्रशंसनीय आहे. लुईसची खेळी सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. या निकालामुळे विंडीज क्रिकेट बोर्डाला संघात अनुभवी व युवा खेळाडूंचे मिश्रण असायला हवे, याची प्रचिती आली असेल. याचा योग्य ताळमेळ साधण्याची काळजी घेतली तर विंडीज क्रिकेटची सध्या असलेली स्थिती नक्कीच सुधारेल. (गेमप्लॅन)