शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Lawn Bowls CWG 2022 : ना कोच, ना पैसे... तरीही लॉन बॉल्समध्ये भारताच्या लेकींनी रचला इतिहास; 'असं' जिंकलं सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 12:15 IST

Lawn Bowls CWG 2022 : CWG2022 भारताचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. पण सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या लेकींचा या प्रवास सोपा नव्हता, अनेक अडचणींवर मात करत त्यांनी नेत्रदिपक भरारी घेतली आहे. 

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया व रुपा राणी तिर्की या भारतीय महिलांनी इतिहास घडविला. लॉन बॉल्स (Lawn Bowls) हा क्रीडा प्रकार कालपर्यंत भारतीयांच्या परिचयाचाही नव्हता, परंतु या चार महिलांनी ऐतिहासिक पदक निश्चित करताच याची चर्चा सुरू झाली. त्यात भारतीय महिलांनी सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कडवा संघर्ष मोडून काढताना १७-१० असा विजय मिळवला. CWG2022 भारताचे हे एकूण चौथे सुवर्णपदक ठरले. पण सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या लेकींचा हा प्रवास सोपा नव्हता, अनेक अडचणींवर मात करत त्यांनी नेत्रदिपक भरारी घेतली आहे. 

लॉन बॉल्ससाठी कोणताही फंड नाही, कोच नाही... असं असतानाही त्यांनी आपली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावलं आहे. चारही जणी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधील असून सर्वांचं राहणीमान अगदी साधं आहे. पण हे सर्व असताना त्यांनी इतिहास रचला आहे. "जी मेहनत आम्ही केली, ज्याचा विचार आम्ही केला ते आम्ही अखेर मिळवलं. गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही यासाठी मेहनत करत होतो. आम्ही खेळत होतो, अनेक मेडल्स आम्ही जिंकले. पण क़ॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल जिंकणं आमचं ध्येय होतं" असं टीम इंडियाने म्हटलं आहे. 

कॉमनवेल्थ गेम्स 2018 नंतर महिला टीमकडे कोणीच कोच नव्हतं. म्हणजेत गेल्या चार वर्षांपासून त्या स्वत:च तयारी करत होत्या. आता चार वर्षांनी त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं आणि भारताने सुवर्णपदक जिंकलं. लॉन्स बॉल्स अनेक वर्षांपासून कॉमनवेल्थचा गेम्सचा हिस्सा आहे. पण भारताने पहिल्यांदा यात मेडल जिंकलं आहे. महिला टीममधील लवली चौबे झारखंडची असून ती पोलीस कॉन्स्टेबल आहे. नयनमोनी साकिया फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये नोकरी करते. पिंकी दिल्लीच्या एका शाळेत शिक्षिका आहे. तर रुपा राणी झारखंडमध्ये खेळाशी संबंधित अधिकारी आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर आजतकशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

'Lawn Bowls' हा खेळ कसा खेळतात माहीत आहे का?

लॉन बॉल पाहताना प्रथम दर्शनी असे दिसेल की दोन्ही टीममध्ये चार खेळाडू असून तीन खेळाडू दूर ठेवलेल्या पिवळ्या चेंडूच्या ( Jack) आपल्या जवळील मोठ्या चेंडूला जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. बरं खेळाडूंना जो चेंडू दिला जातो त्याचा आकार हा पिवळ्या चेंडूपेक्षा दुप्पट मोठा असतो. त्या चेंडूच्या बाजू किंचितशा सपाट असतात आणि तो वजनदार असतो. तो वजनदार बॉल खेळाडू फेकून नव्हे तर जमिनीलगत ठेऊन ( सरपटी) त्या समोरील पिवळ्या चेंडूपर्यंत पोहोचवायचा असतो. तो बॉल जॅकच्या जितक्या जवळ जाईल, तितके गुण मिळण्याचे प्रमाण अधिक असते.

दोन्ही संघ जॅकच्या जास्तीत जास्त जवळ आपल्याकडील चेंडू पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे ज्या संघाचे जेवढे चेंडू जॅक जवळ असतील तेवढे त्या संघाला गुण दिले जातात. प्रत्येक फेरीत ९ प्रयत्न केले जातात. १५ फेरीपर्यंत हा खेळ सुरू राहतो आणि जेवढे ज्याचे गुण अधिक त्याला विजयी घोषित केले जाते. नाणेफेक महत्त्वाची ठरले, कारण जो संघ आधी चेंडू फेकणार असतो तो प्रतिस्पर्धीला एका ठराविक अंतरापर्यंत जॅक टाकण्याची संधी देतो आणि त्यानंतर सामना सुरू होतो. दोन्ही संघांचे खेळाडू आळीपाळीने चेंडू जॅक पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाIndiaभारतGold medalसुवर्ण पदक