शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

गत उपविजेत्या सचिनचा धक्कादायक पराभव

By admin | Updated: January 9, 2016 03:29 IST

गत उपमहाराष्ट्र केसरी पुणे जिल्हा संघाचा सचिन येळभर याचा खळबळजनक पराभव मानाच्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीचे वैशिष्ट्य ठरले.

नागपूर : गत उपमहाराष्ट्र केसरी पुणे जिल्हा संघाचा सचिन येळभर याचा खळबळजनक पराभव मानाच्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीचे वैशिष्ट्य ठरले. चिटणीस पार्कमध्ये सुरू असलेल्या रोमहर्षक लढतींमध्ये सकाळच्या सत्रात बीडचा गोकूळ आवारे याने सचिनला तीन विरुद्ध दोन अशा गुणांनी धूळ चारून पराभवाची चव चाखविली.मातीच्या आखाड्यात ५७ किलो वजन गटात सोलापूर जिल्ह्याचा ज्योतिबा अटकळे नवा विजेता बनला. त्याला लातूरच्या शरद पवारने अंतिम लढतीत पुढे चाल दिली. त्याआधी उपांत्य लढतीत गतविजेता सागर मारकड(पुणे जिल्हा)याला गतउपविजेता शरद पवार याने अत्यंत चुरशीच्या लढतीत प्रत्येकी पाच गुणानंतर कलात्मक डावाच्या आधारे सागरला नमवित गत पराभवाची परतफेड केली. दुसरीकडे गतविजेता विजय चौधरी, राहुल खानेकर, सचिन मोहोळ, विष्णू खोसे, विक्रांत जाधव, महादेव सरगर, समाधान पाटील, गोकूळ आवारे, विजय धुमाळ, योगेश पवार, बाला रफिक शेख, किरण भगत, विलास डोईफोडे यांनी तिसऱ्या फेरीत विजय नोंदवित चौथी फेरी गाठली. किताबाच्या अंतिम फेरीत कोण कायम राहणार, हे आज शनिवारी ठरणार आहे. माती विभागात जळगावचा विजय चौधरी याने तिसऱ्या फेरीत सुरुवातीला दोन गुणांची आघाडी घेणाऱ्या सांगलीचा अण्णा कुवळेकरचा ‘गदालोट’ हा हुकमी डाव मारून पहिल्या तीन मिनिटांत चितपटद्वारे विजय नोंदविला. बीडचा गोकूळ आवारे याने मुंबई उपनगरच्या संकेत जांभुळकरचा पहिल्या तीन मिनिटांत पराभव केला. उस्मानाबादच्या विजय धुमाळने कल्याणचा गुरू भोईर याला चित करीत विजय नोंदविला.नगरच्या योगेश पवारने ठाणे जिल्ह्याच्या भीमा पाटीलवर अवघ्या दहा सेकंदात सरशी साधली. सोलापूरच्या बाला रफिक शेख याने पिंपरी- चिंचवडचा प्रमोद मांडेकर याला तांत्रिक गुणांवर नमविले. औरंगाबाद जिल्ह्याचा शकील पठाण याने नाशिक शहरचा नवनाथ मते याचे आव्हान संपविले. गादी विभागात तिसऱ्या फेरीच्या सामन्यात पुणे जिल्हा संघाचा राहुल खणेकर याने नाशिकचा गौरव गणोरे याला २० सेकंदात चित केले. नागपूरचा रामचंद्र यंगळ हा उस्मानाबादचा दत्ता खणके याच्याकडून ०-१० गुणांनी पराभूत झाला. पुणे शहरचा महेश मोहोड याने साताऱ्याचा नीलेश लोखंडे याने १५ सेकंदात दहा गुणांनी तांत्रिक आधारे नमविले. ठाणे जिल्ह्याचा अनंत मडवी याने ठाणे शहरचा दीपक वदक याचा चितपटद्वारे पराभव केला. कोल्हापूरच्या समीर देसाईने मुंबईच्या विक्रांत जाधवचा १०-० ने तांत्रिक आधारे पराभव केला. त्याआधी, ७४ किलो गादी गटात नगरचा केवल भिंगारे सुवर्णविजेता ठरला. त्याने सोलापूरचा नितीन भगत याला चारी मुंड्या चित केले. औरंगाबाद शहरचा नवनाथ औताडे व कोल्हापूरचा ऋषिकेश यांना कांस्य मिळाले.(क्रीडा प्रतिनिधी)