लंका डाव
By admin | Updated: December 16, 2014 23:44 IST
दिलशानचे शतक, लंकेची दमदार मजल
लंका डाव
दिलशानचे शतक, लंकेची दमदार मजलकोलंबो : त्याआधी, तिलकरत्ने दिलशानने कारकीर्दीतील ३०० वा सामना खेळताना झळकाविलेल्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने ६ बाद ३०२ धावांची दमदार मजल मारली. दिलशानने आज वन-डे कारकीर्दीत ९ हजार धावांचा पल्ला गाठला. श्रीलंकेच्या डावात आक्रमक अर्धशतकी खेळी करणारे थिसारा परेरा व दिनेश चंदीमल यांचे योगदानही उल्लेखनीय ठरले. दिलशानने १२४ चेंडूंमध्ये ९ चौकार व १ षटकाराच्या साहाय्याने १०१ धावा फटकाविल्या. चंदीमलने ५० चेंडूंमध्ये ५० तर परेराने २६ चेंडूमध्ये ५४ धावा फेकाविल्या. इंग्लंडतर्फे ख्रिस जॉर्डन व मोईन अली यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)