शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
7
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
8
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
9
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
10
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
11
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
12
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
13
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
14
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
15
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
16
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
17
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
18
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
19
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
20
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार

ललिता अ‍ॅथलेटिक्समध्ये इतिहास रचणार ?

By admin | Updated: August 15, 2016 06:32 IST

ललिता बाबर आज, सोमवारीे रिओ आॅलिम्पिकमध्ये जेव्हा महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेज फायनलमध्ये खेळण्यास उतरेल तेव्हा तिचे लक्ष नवीन इतिहास रचण्याकडे असणार

रिओ : महाराष्ट्राची महिला अ‍ॅथलिट ललिता बाबर आज, सोमवारीे रिओ आॅलिम्पिकमध्ये जेव्हा महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेज फायनलमध्ये खेळण्यास उतरेल तेव्हा तिचे लक्ष नवीन इतिहास रचण्याकडे असणार आहे.महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील २७ वर्षीय ललितासाठी पदक जिंकण्याचा मार्ग खडतर आहे; परंतु अशक्य मात्र नाही. ती १९८४ लॉस एंजिल्स आॅलिम्पिकमध्ये पी. टी. उषानंतर अ‍ॅथलेटिक्स फायनलसाठी पात्र ठरणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.ललिता १९.७६ सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमासह आपल्या हिटमध्ये चौथ्या स्थानी राहताना फायनलला पात्र ठरण्यात यशस्वी ठरली. ती सर्वच क्वॉलिफायरमध्ये सातव्या स्थानावर आली. तिच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर तिचे आई-वडील यांना महाराष्ट्राच्या मंदिरात जाऊन पूजा करताना दाखविले गेले आणि ती आज आपल्या कामगिरीत सुधारणा करू शकली तर ती अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताची नवीन स्टार म्हणून पुढे येईल. आता ललिता उषाच्या कामगिरीत सुधारणा करू शकेल अथवा नाही हे पाहावे लागेल. पीटी उषाचे कांस्यपदक थोडक्यात हुकले होते. फायनलमध्ये ललिताला वर्ल्डचॅम्पियन, गत आॅलिम्पिक चॅम्पियन आणि हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या धावपटूंचे आव्हान असणार आहे.गेल्या वर्षी बीजिंगमध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये ललिताच्या पुढे असणाऱ्या कमीत कमी पाच धावपटू फायनलमध्ये असणार आहेत. विश्व चॅम्पियनशिपमध्ये ललिताने ९ मिनिट २७.८६ सेकंद वेळ नोंदवताना आठवे स्थान मिळविले होते. आज, सोमवारी विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारात केनियात जन्मलेली आणि २0१३च्या बहरीनकडून खेळणारी रुथ जेबेट असेल. ती आठ मिनिट ५९.९७ सेकंदांसह हंगामात सर्वोत्तम कामगिरी करणारी खेळाडू आहे. २0१४ आशियाई क्रीडा स्पर्धेत जेबेट अपात्र ठरल्यानंतर ललिताला मिळालेल्या कांस्यपदकाचे रूपांतर रौप्यपदकात झाले होते.