शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

स्थानिक मैदानाची उणीव जाणवते : द्रविड

By admin | Updated: April 10, 2015 08:59 IST

आयपीएलमध्ये दोन वर्षांपासून स्वत:चे स्थानिक सामने दुसऱ्या मैदानावर खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सला स्थानिक मैदानाची उणीव जाणवत आहे.

मुंबई : आयपीएलमध्ये दोन वर्षांपासून स्वत:चे स्थानिक सामने दुसऱ्या मैदानावर खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सला स्थानिक मैदानाची उणीव जाणवत आहे. या संघाचा सल्लागार राहुल द्रविड याने ही खंत व्यक्त केली; पण इतरत्र खेळण्यासाठी आम्ही मानसिकरीत्या सज्ज झाल्याचेही तो म्हणाला.संघाचा माजी कर्णधार आणि आता सल्लागार बनलेला द्रविड म्हणाला, ‘मागच्या वर्षी आम्ही अहमदाबाद हे स्थानिक मैदान निवडले होते. यंदा मुंबईत खेळणार आहोत. आम्हाला सवाई मानसिंग स्टेडियमची उणीव जाणवते. त्या मैदानावर आमचा रेकॉर्डदेखील चांगला आहे.’ राजस्थानने मानसिंग स्टेडियमवर पहिल्या सहा पर्वांतील ३८ पैकी २९ सामने जिंकले हे विशेष. २०१४ साली मात्र आरसीएला सरकारकडून परवानगी न मिळाल्याने शहरात एकही सामना आयोजित होऊ शकला नाही. तेव्हापासून हे प्रकरण लालफितशाहीत अडकले आहे. आरसीएने अहमदाबादच्या मोतेरा मैदानावर चारपैकी दोन सामने जिंकले आहेत. २०१५ च्या पर्वात आम्ही या मैदानावर अधिक सामने जिंकू, असा विश्वास द्रविडने व्यक्त केला. यंदा आठव्या पर्वात मुंबईच्या स्थानिक मैदानावर राजस्थान रॉयल्सला तीन सामने खेळायचे आहेत. यावर द्रविड म्हणाला, ‘आमच्या संघासाठी यंदा परिस्थिती वेगळी आहे. अहमदाबाद येथे खेळल्यानंतर आता क्रिकेट क्लब आॅफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळावे लागत आहे. येथे सरावासाठी सर्व खेळाडू उत्सुक आहेत.’ कामगिरीत सातत्य राखणारे आणि दडपणातही उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू टी-२० क्रिकेटला हवे आहेत. विजयाची भूक असेल तर या प्रकारात निश्चितपणे विजय मिळत असल्याचे द्रविडने सांगितले. (वृत्तसंस्था)