इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आणि चॅम्पियन्स लीग टी - 2क् या शॉर्ट फॉरमॅट स्पध्रेत चांगली कामगिरी केल्यानंतर भारताच्या राष्ट्रीय संघात सहज स्थान मिळते, हे काही वेगळे सांगायला नको. कुलदीप यादव ज्याने एकही प्रथम o्रेणी लढत खेळलेली नाही त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या तीन वन-डे साठी संघात स्थान मिळाल्याने, त्याची प्रचिती पुन्हा आली आहे. चिनामन ट्रिकने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणा:या कुलदीपने निवड समितीला आकर्षित केले आणि त्याची अंतिम 14 जणांमध्ये निवड झाली.
उत्तर प्रदेशच्या या खेळाडूने एकही प्रथम o्रेणी सामना खेळला नाही, तर त्याची संघात निवड का करण्यात आली हा चिंतनाचा विषय आहे. काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेच्या उपांत्य फेरीच्या पर्थ स्कोचर्सविरुद्धच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्ससाठी त्याने 24 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या. या वेळी त्याच्या चिनामन गोलंदाजीने सर्वाचे लक्ष वेधले. पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीज राजा यांनी समालोचन करताना कुलदीपची वाह वाह केली होती. ते म्हणाले, या खेळाडूकडे अप्रतिम प्रतिभा आहे आणि भारताचा भविष्याचा तो गोलंदाज आहे. असे असले तरी इतक्या लवकर त्याला भारतीय संघात स्थान मिळणो हे अपेक्षित नव्हते. कुलदीप आता विंडिज मालिकेत अमित मिo्रासह भारताची फिरकीची मदार सांभाळणार आहे. मुंबईत शुक्रवारी झालेल्या सराव सामन्यात विंडिज फिरकीसमोर डळमळला होता. सध्या तो कोलकाता संघाकडून खेळत आहे. कोलकाता संघाचा सदस्य असल्याचा खूप आनंद होतो. त्यांनी मला ज्युनिअर खेळाडू असल्याची जाणीव होऊ दिली नाही. सर्वाकडून आदर आणि पाठींबा मिळतो. मी स्टार खेळाडूंसोबत आहे असे कधीच वाटत नसल्याचे, कुलदीपने सांगितले.
गेल्या दोन वर्षात त्याला संधीच मिळाली नाही. कोलकाता संघातही त्याला शाकिब आणि युसूफ पठाण यांच्यानंतरच संधी मिळत असे. चॅम्पियन्स लीगनंतर रणजी करंडक स्पध्रेवर लक्ष्य केंद्रित करणार असल्याचे कुलदीप सांगतो.
च्1क् वर्षात एकही प्रथम o्रेणी क्रिकेट न खेळता भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवणारा कुलदीप हा पहिला खेळाडू आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशच्या रणजी संघात त्याला संधी देण्यास व्यवस्थापनाने नकार दिला होता.