शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पुणे संघाविरुद्ध कोलकाताचे पारडे जड

By admin | Updated: November 7, 2014 01:58 IST

सुपरलीगमध्ये उद्या होणा-या सामन्यात पुणेविरुद्धच्या लढतीत एटलेटिको डी कोलकाता संघाचे पारडे जड असेल.

कोलकाता : चमत्कारिक फॉरवर्ड फिकरू टेफेरा आणि प्रशिक्षक एंटोनियो लोपेज हबास यांच्या उपस्थितीने इंडियन सुपरलीगमध्ये उद्या होणा-या सामन्यात पुणेविरुद्धच्या लढतीत एटलेटिको डी कोलकाता संघाचे पारडे जड असेल.एआयएफएफच्या शिस्तपालन समितीने पुराव्याअभावी हबासवरील बंदी दोन सामन्यांपुरतीच ठेवली आहे. त्यामुळे स्पेनचा हा दिग्गज प्रशिक्षक उद्या मैदानावर उपलब्ध असेल. त्याशिवाय इथिओपियाचा फॉरवर्ड फिकरूदेखील उद्या खेळणार असल्यामुळे कोलकाता संघ आणखी मजबूत झाला आहे. या दोघांच्या अनुपस्थितीत एटीकेने ४ संभाव्य गुण गमावले आहे. मैदानावर फिकरू आणि मैदानाबाहेर हबास यांच्या व्यूहरचनेचा फटका या संघाला बसला होता.एटीके लुई गर्सियाच्या गोलच्या बळावर ते चेन्नईविरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते; परंतु किंगसुक देबनाथच्या चेन्नई बॉक्सच्या आत अनावश्यक अडथळा आणल्यामुळे संघाला ३ गुण गमवावे लागले.एटीके अजूनही चेन्नईयन एफसी संघाच्या २ गुणांनी पुढे आहे; परंतु त्यांना अजून दोन सामने खेळणे बाकी आहे. त्यामुळे एटीके संघाच्या नंबर वनवर धोका कायम आहे. अशा परिस्थितीत ते घरच्या मैदानावर ३ गुण प्राप्त करण्यासाठी कोणतीही उणीव बाकी ठेवणार नाहीत.दुसरीकडे, पुण्याचे ५ सामन्यांत ७ गुण आहेत आणि ते पाचव्या क्रमांकावर आहेत. गेल्या ३ सामन्यांत त्यांनी दोन विजय मिळविले आहेत. नायजेरियन डुडू ओमगाबेमीच्या मैदानावर खेळण्याच्या अनुभवाचा चांगला उपयोग करून पुणे एटीकेला अडचणीत टाकू शकते. (वृत्तसंस्था)