शहरं
Join us  
Trending Stories
1
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
2
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
6
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
7
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
8
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
9
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
10
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
11
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
12
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
13
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
14
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
15
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
16
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
17
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
18
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
19
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
20
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली

कोलकाता नाइट रायडर्सचा दिल्ली डेयरडेविल्सवर नऊ गडी राखून विजय

By admin | Updated: April 10, 2016 22:56 IST

दिल्ली डेयरडेविल्सने दिलेल्या सोप्या ९९ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाइट रायडर्सने १४.१ षटकात एक बाद ९९ धावा करत ९ गड्यांनी विजय संपादन केला.

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १० -  आयपीएलच्या नवव्या पर्वातील पहिल्याच लढतीत कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली डेयरडेविल्सचा ९ विकेटने पराभव करत विजयी सलामी दिली.  गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली डेयरडेविल्सचा धोबीपछाड करत नऊ गडी राखून विजय मिऴविला.  या सामन्यात  दिल्ली डेयरडेविल्सने दिलेल्या सोप्या ९९ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाइट रायडर्सने १४.१ षटकात एक बाद ९९ धावा करत ९ गड्यांनी विजय संपादन केला.
 
आंद्रे रसेल, ब्रॉड हॉग, जॉन हेस्टिंग्सने आणि पीयूष चावलाच्या धारघार गोलंदाजीनंतर कर्णधार गौतम गंभीर(नाबाद ३८), रॉबिन उथप्पाने(३५) आणि मनिष पांडे(नाबाद १५) यांनी केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर केकेआरने दिल्ली डेयरडेविल्सचा ९ गड्यानी पराभव केला. दिल्लीकडून अमित मिश्राने केकेआरचा एक फलंदाज बाद केला. 
 
त्यापुर्वी, कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करताना आंद्रे रसेल, ब्रॉड हॉग, जॉन हेस्टिंग्सने आणि पीयूष चावलाच्या शिस्तबध्द गोलंदाजी समोर दिल्ली डेयरडेविल्सची तगडी फलंदाजी ढासळली, रसेलने आघाडीच्या ३ फलंदाजांना बाद केले तर ब्रॉड हॉग, आणि पीयूष चावलाने शेपूट गुंडाळले. केकेआरच्या धारधार गोंलदाजी समोर दिल्ली डेयरडेविल्सला संपुर्ण २० षटकेही फलंदाजी करता आली नाही. दिल्ली डेयरडेविल्सने निर्धारित १७.४ षटकात सर्वबाद ९८ धावापर्यंत मजल मारता आली. त्यामुळे विजयासाठी केकेआरसमोर ९९ धावांचे सोपे आव्हान आहे. 
 
आंद्रे रसेलने दिल्ली डेयरडेविल्सची आघाडीची फळी उध्वस्त करत दिल्लीला धावांचा डोंगर उभा करण्यापासून रोखले. त्याने आघाडीच्या ३ फलंदाजांना बाद करत कंबरडेच मोडले. दिल्लीने आक्रमक सुरवात केली होती. डि कॉक आणि आग्रवाल यांनी पहिल्या २ षटकात २४ धावा वसूल केल्या होत्या. कोलकातासाठी रसेल तिसरे षटक घेऊन आला डेयरडेविल्स ढेपाळले. रसेलने डि कॉक (१७), आग्रवाल(९) आणि श्रेअस अयरला(०) बाद केले. तर जॉन हेस्टिंग्सने नायर(३) आणि नाथन कोल्टर नाइलला(७) बाद केले. ब्रॉड हॉगने आपल्या ४ षटकात १९ धावा देत, मिश्रा(३), संजू सॅमसन(१५) आणि पवन नेगीला (११)बाद केले. चावलाने आपल्या लेगस्पिन गोलंदाजीने ख्रिस मॉरिस(११), धोकादायक कार्लोस ब्रेथवेट(६) यांना बाद केले. 
 
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआरचा घरच्या मैदानावरील रेकॉर्ड उत्तमच आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत अपेक्षानुरुप कामगिरी न करू शकलेल्या या संघाला संयोजन सुधारावे लागेल. केकेआरला पाच वर्षांत तिसऱ्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी पहिल्या सामन्यापासून विजयी लय कायम राखाली आहे.
दिल्लीने यंदा संघात आमूलाग्र बदल केले. युवा खेळाडूंवर यंदा अधिक विश्वास दाखविण्यात आला आहे. ब्रेथवेटवर या संघाने चार कोटी २० लाख खर्च केले तेव्हा फारसे कुणी ओळखत नसावेत पण टी-२० विश्वचषकाने त्याला स्टार बनविले.