शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

केकेआर विजयी

By admin | Updated: April 20, 2016 03:27 IST

गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यानंतर सलामीवीर रॉबिन उथप्पाने केलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये आपला तिसरा

मोहाली : गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यानंतर सलामीवीर रॉबिन उथप्पाने केलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये आपला तिसरा विजय नोंदवताना किंग्ज इलेव्हन पंजाबला ६ विकेटनी नमविले. पंजाबच्या १३८ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याने १७.१ षटकांत ४ बाद १४१ धावा केल्या.आय. एस. बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याने यजमान पंजाबला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले. गोलंदाजांनी पंजाबला रोखल्यानंतर उथप्पाने जबरदस्त फटकेबाजी करताना संघाला विजयी केले. उथप्पा आणि कर्णधार गौतम गंभीर यांनी सावध सुरुवात करताना खेळपट्टीचा अंदाज घेतला. एका बाजूने उथप्पाने फटकेबाजी करून कोलकात्याच्या धावसंख्येला वेग दिला. गंभीरनेही जास्तीत जास्त उथप्पाला स्ट्राइक देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ८.३ षटकांत ८२ धावांची शानदार सलामी दिली.उथप्पा अर्धशतक झळकवून लगेच बाद झाला. त्याने २८ चेंडूंत ९ चौकारांसह ५३ धावा फटकावल्या. यानंतर गंभीरही ३४ चेंडूंत ३४ धावा काढून परतला. दोघेही झटपट बाद झाल्यानंतर कोलकात्याच्या धावसंख्येला खीळ बसली. मात्र, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव व युसूफ पठाण यांनी संघाला विजय मिळवून दिला. पंजाबकडून अक्षर पटेल व प्रदीप साहू यांनी चांगला मारा करताना प्रत्येकी २ बळी घेतले. तत्पूर्वी, अडखळत्या सुरुवातीनंतर आक्रमक फलंदाज शॉन मार्शने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने निर्धारित षटकांत ८ बाद १३८ धावांची मजल मारली. मार्शने ४१ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५६ धावा केल्या. तर, मुरली विजयने २२ चेंडूंत २६ धावा काढल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज चमक दाखवू शकला नाही. गोलंदाजीत मॉर्नी मॉर्केल (२/२७) व सुनील नरेन (२/२७) यांनी अचूक मारा करून पंजाबला रोखले.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ८ बाद १३८ धावा (शॉन मार्श नाबाद ५६, मुरली विजय २६; सुनील नरेन २/२२, मॉर्नी मॉर्केल २/२७) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १७.१ षटकांत ४ बाद १४१ धावा (रॉबिन उथप्पा ५३, गौतम गंभीर ३४; प्रदीप साहू २/१८, अक्षर पटेल २/१९).