शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
2
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
3
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
4
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
5
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
6
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
7
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
8
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
9
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
10
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
11
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
12
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
13
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
14
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
15
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
16
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
17
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
18
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
19
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
20
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?

केकेआरची प्लेआॅफमध्ये धडक

By admin | Updated: May 23, 2016 01:18 IST

ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा २२ धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या नवव्या पर्वात दिमाखात प्लेआॅफमध्ये प्रवेश निश्चित केला.

कोलकाता : युसूफ पठाण व मनीष पांडे यांच्या आक्रमक फलंदाजीनंतर सुनील नारायणच्या नेतृत्वाखाली फिरकीपटूंनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सने (केकेआर) रविवारी ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा २२ धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या नवव्या पर्वात दिमाखात प्लेआॅफमध्ये प्रवेश निश्चित केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या केकेआर संघाची एकवेळ ३ बाद ५७ अशी अवस्था होती. त्यानंतर युसूफ पठाण (५२ धावा, ३४ चेंडू) आणि मनीष पांडे (४८ धावा, ३० चेंडू) यांनी चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. एकवेळ केकेआर संघ दोनशेच्या आसपास मजल मारण्यात यशस्वी ठरेल, असे वाटत होते; पण सनरायझर्सच्या गोलंदाजांनी अखेरच्या पाच षटकांत अचूक मारा करीत केवळ ३० धावा बहाल केल्या. त्यामुळे सनरायझर्स संघ केकेआरला ६ बाद १७१ धावांत रोखण्यात यशस्वी ठरला. फिरकीपटूंना अनुकूल या खेळपट्टीवर सनरायझर्स संघासाठी ही विशाल धावसंख्या ठरली. संक्षिप्त धावफलक४कोलकाता नाईटरायडर्स : रॉबिन उथप्पा झे. विलियम्सन गो. सरण २५, गौतम गंभीर झे. हेन्रिक्स गो. हुड्डा १६, मनीष पांडे झे. विलियम्सन गो. भुवनेश्वर ४८, युसूफ पठाण नाबाद ५२. एकूण २० षटकांत ६ बाद १७१. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-३१-२, बरिंदर सरण ४-०-३१-१, हुडा २-०-१६-२, मुस्तफिजुर रहमान ४-०-३२-१.४सनरायझर्स हैदराबाद : शिखर धवन झे. मुन्रो गो. कुलदीप यादव ५१, डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. नारायण १८, नमन ओझा झे. उथप्पा गो. नारायण १५, युवराज सिंग झे. सतीश गो. शाकिब १९. एकूण २० षटकांत ८ बाद १४९. गोलंदाजी : राजपूत २-०-२१-१, शाकिब ४-०-३४-१, नारायण ४-०-२६-३, कुलदीप यादव ४-०-२८-२.