शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

नाशिकचा किसन तडवी महामॅरेथॉन विजेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 03:34 IST

विंटोजिनो प्रस्तुत लोकमत महामॅरेथॉन सहप्रायोजक एकता वर्ल्ड आणि अशोका यांच्या सहकार्याने आयोजित सर्वांत मोठ्या लोकमत हाफमहामॅरेथॉन स्पर्धेत नाशिकचा किसन तडवी विजेता ठरला.

नाशिक : विंटोजिनो प्रस्तुत लोकमत महामॅरेथॉन सहप्रायोजक एकता वर्ल्ड आणि अशोका यांच्या सहकार्याने आयोजित सर्वांत मोठ्या लोकमत हाफमहामॅरेथॉन स्पर्धेत नाशिकचा किसन तडवी विजेता ठरला. एक तास नऊ मिनिटे आणि १२ सेकंदांची वेळ नोंदवत त्याने विजेतेपद पटकाविले, तर महिलांमधील नगरची पूजा राठोड प्रथम आली. दहा किलोमीटरमध्ये पुरुषांमध्ये गणेशगावचा दिनकर लिलके, तर महिलांमध्ये लातूरची पूजा श्रीडोळे विजेती ठरली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिकांसह चषक प्रदान करण्यात आला.गोल्फ क्लब मैदान येथून या महामॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी महापौर रंजना भानसी, लोकमत महामॅरेथॉनच्या संयोजिका रुचिरा दर्डा, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, विंटोजिनोचे एमडी प्रकाश उपाध्याय, एकता वर्ल्डचे प्रेसिडेंट (ब्रँड अँड कम्युनिकेशन) एम. विकास, अशोका बिल्डकॉनचे चेअरमन अशोक कटारिया, अशोकाचे प्रोजेक्ट डायरेक्टर आणि सीईओ संजय लोंढे, संदीप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन. रामचंद्रन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.सकाळी ६.१५ वाजता २१ किलोमीटरच्या हाफमहामॅरेथॉनला मान्यवरांनी झेंडा दाखविला आणि धावपटूंनी २१ किलोमीटरसाठी धाव घेतली. गोल्फ क्लब ते हॉटेल संस्कृतीपर्यंत असलेल्या हाफमहामॅरेथॉन मार्गावर ठिकठिकाणी धावपटूंचे विविध कलापथके आणि शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत केले. अत्यंत उत्साहवर्धक आणि रंगारंग सोहळ्यात धावपटूंनी आंतरराष्टÑीय दर्जाच्या मॅरेथॉनमध्ये धावण्याचा अनुभव घेतला. १० किलोमीटर रनला सकाळी ६.३० वाजता सुरुवात झाली, तर त्यानंतर ६.४५ वाजता ५ व ६.५५ वाजता ३ किलोमीटरसाठी नाशिककरांनी धाव घेतली.व्यावसायिक धावपटू, नियमित सराव करणारे खेळाडू, तसेच आरोग्यविषयक जागरूक असलेले, तसेच ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक आणि असंख्य बालकांनी जल्लोष करीत लोकमत महामॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला.४० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक गटांचे निकाल : २१ किलोमीटर : पांडुरंग पाटील (०१:२५:११) प्रथम, हरिश्चंद्रा (०१:२६:११), कैलाश मंग (०१:२८:२९), तर महिलांमध्ये शोभा देसाई (०१:४९:३९), शीतल संगवई (०१:५३:२७), तर प्रतिभा नाडकर (०२:०३:४९) अशा वेळेची नोंद करीत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.१० किलोमीटरमध्ये रोमेश आबा (००:४१:४९), नंदू वाघुळे (००:४३:३९), भगवान कछाव (००:४५:१८), तर महिलांमध्ये सौ. कछाव (००:५९:३७), तर सुगंधा पाटील यांनी (०१:०३:३०) अशी वेळ नोंदवून विजेतेपद मिळविले, तर महिलांमध्ये ब्युला मंडल (००:५९:२४), विठुबाई कछाव (००:५९:३७), तर शुभदा पाटील (०१:०३:३०) अशी वेळ नोंदवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला.डिफेन्स गट : २१ किलोमीटर : दशरथ पाटील (०१:२१:३३), जिनो अ‍ॅन्टोनी (०१:२५:४७), पंकज कुºहाडे (०१:३५:५२) यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.डिफेन्स महिला गटात : योगिता वाघ प्रथम (०१:४४:३७), अश्विनी देवरे द्वितीय (०२:००:०२), मीना चौधरी, तृतीय (०२:०४:५८) यांनी आपापल्या गटात मॅरेथॉन जिंकली.>हजारो स्पर्धकांचा सहभाग२१ किलोमीटर खुल्या गटामध्ये किसन तडवी (एक तास नऊ मिनिटे १२ सेकंद), पुकेश्वर लाल (एक तास नऊ मिनिटे २७ सेकंद), तर कांतिलाल कुंभार (एक तास १० मिनिटे ४२ सेकंद) यांनी अशी वेळ नोंदवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.२१ किलोमीटर महिलांमध्ये पूजा राठोड हिने एक तास ३१ मिनिट ४१ सेकंद अशी वेळ नोदवून विजेतपद पटकाविले, तर निवृत्ता दहावड हिने (एक तास ३१ मिनिटे ४६ सेकंद) अशी वेळ नोंदवून द्वितीय, तर श्रृती पांडे हिने (एक तास ४९ मिनिट ०४ सेकंद) वेळ नोंदवत तृतीय क्रमांक मिळविला. १० किलोमीटरमध्ये दिनकर लिलके (३३ मिनिट ३७ सेकंद), गणेश भोंबे (३४ मिनिट ३५ सेकंद) आणि सतीश वाघचौरे (३६ मिनिट ४२ सेकंद) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविा, तर याच गटात महिलांमध्ये पूजा श्रीडोळे (४१ मिनिट ३८ सेकंद), नंदिनी पवार (४५ मिनिट ३६ सेकंद), पूनम वाणी(५६ मिनिट ०७) सेकंदाची वेळ नोंदवतअनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने मॅरेथॉन जिंकली.