शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

 खो खो स्पर्धा : विहंग आणि सरस्वती संघांमध्ये अंतिम फेरी रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 22:05 IST

सरस्वती स्पोर्ट्स क्लबने  फादर अँग्नल जिमखान्याचा ४-३ (०२-०१ व ०२-०२) असा १ गुणाने पराभव केला.

मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व मुंबई खो-खो संघटनेच्या सहकार्याने विद्यार्थी क्रीडा केंद्राने ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त २२ ते २६ जानेवारी या कालावधीत लालमैदान, आई माई मेरवानजी स्ट्रीट, परळ येथे ४ फुट ११ इंच (कुमार गट) व व्यावसायिक निमंत्रित विभागीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

व्यावसायिक गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नवी मुंबई महानगरपालिकेने महावितरण कंपनीवर १२-१० (१०-०४ व ०२-०६) असा  असा दोन गुणांनी पराभव केला. या सामन्यात नवी मुंबई पालिकेच्या  प्रदीप जाधवने दोन मिनिटे दहा सेकंद व एक मिनिटे चाळीस  सेकंद संरक्षण करत दोन गडी बाद केले.  महेश शिंदेने एक मिनिटे तीस सेकंद व  नाबाद एक मिनिटे दहा सेकंद संरक्षण केले व आक्रमणात एक गडी बाद केला. गजानन शेंगाळने आक्रमणात चार गडी टिपले. पराभूत महावितरणतर्फे सिद्वीक भागतने दोन मिनिट संरक्षण करत दोन खेळाडू बाद केले तर प्रतीक वाईकरने  एक मिनिट चाळीस सेकंद संरक्षण केले व एक गडी बाद केला.  तसेच विराज कोठमकरने एक मिनिट वीस सेकंद  संरक्षण केले व एक गडी बाद करत चांगला खेळ केला.

दुसऱ्या व्यावसायिक उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात श्री साई इलेट्रीकल्सने पश्चिम रेल्वेवर  १६-१५ (०९-०८-०७-०७) असा एका गुणाने पराभव केला. या सामन्यात श्री साई इलेट्रीकल्सतर्फे खेळताना पियुष घोलमने दोन मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण करत पाच गडी बाद केले.  शुभम शिगवणने एक मिनिटे तीस सेकंद, एक मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण करत एक गडी बाद केला तर विश्वजित कांबळेने  प्रत्येकी एक मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण केले. तर वेदांत देसाई याने आक्रमणात तीन गडी टिपले.  पराभूत पश्चिम रेल्वेच्या अमोल जाधवने एक मिनिट चाळीस सेकंद व दोन मिनिटे पन्नास सेकंद  संरक्षण करत दोन गडी बाद केले. राहुल उईकेने एक मिनिटे संरक्षण करत आक्रमणात सात गडी बाद केले तर रंजन शेट्टीने एक मिनिटे संरक्षण करत आक्रमणात चार गडी बाद करत चांगला प्रतिकार केला.

कुमारांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने  फादर अँग्नल जिमखान्याचा ४-३ (०२-०१ व ०२-०२) असा १ गुणाने पराभव केला. या सामन्यात सरस्वतीच्या सुरज सोलकरने नाबाद ७:०० मिनिटे  संरक्षण करत आक्रमणात १ गडी बाद करत अष्टपैलू खेळ केला, सुरज वैश्यने ४:१० मिनिटे संरक्षण केले. तर भूषण खांबेने २:२० मिनिटे संरक्षण केले. पराभूत फादर अँग्नलच्या ऋषिकेश चोरगेने १:१०, ४:२० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात १ खेळाडूला बाद केले. तर राजवधान दळवीने ४:४०, नाबाद १:१० मिनिटे संरक्षण करत चांगला प्रतिकार केला.

कुमारांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विहंग क्रीडा मंडळने, शिर्सेकर महात्मा गांधीचा ०८-०४ (०५-०२ व ०३-०२)  असा ४ गुणांनी पराभव केला. या सामन्यात विहंगतर्फे खेळताना आशिष गौतमने २:००, ३:०० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात ३ खेळाडूला बाद करून अष्टपैलू खेळ केला. गणेश यादवने २:२०, २:५० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात १ खेळाडू बाद केला.  मयुरेश मोरेने नाबाद २:३०, नाबाद १:१० मिनिटे संरक्षण केले. पराभूत महात्मा गांधीतर्फे खेळताना सुजय गायकवाडने २:००, २:३० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात १ खेळाडू बाद केला. तर मंधन लोहारने २:२०, १:४० मिनिटे संरक्षण करत चांगला प्रतिकार केला.

टॅग्स :Kho-Khoखो-खो