शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

खेलो इंडिया : कुस्तीत अमोल बोंगार्डे, वेताळ शेळके यांना सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 21:18 IST

मुष्टीयुद्धात महाराष्ट्राची घोडदौड

आसाम, गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात पदतालिकेत आघाडी कायम राखणा-या महाराष्ट्रालाकुस्ती क्रीडा प्रकारातील दोन सुवर्ण, चार रौप्य, तीन ब्रॉंझपदकांची साथ मिळाली. आजही पदक मिळविणारे बहुतेक कुस्तीगीर कोल्हापूरचेच होते. सुवर्णपदक मुलांच्या १७ वर्षांखालील गटात अमोल बोंगार्डे याने मिळवून दिले. ९२ किलो वजनी महाराष्ट्राच्या वेताळ शेळकेने सुवर्णपदक पटकाविताना उत्तरप्रदेशच्या अनुजला गुणांवर पराभूत केले.

    लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेच्या संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत आज मुलांच्या गटात अक्षय ढेरे (५१ किलो), कालिचरण (७१ किलो) आणि प्रतिक (८० किलो) यांनी रौप्यपदक मिळविले. महाराष्ट्राचा शुभम पाटिल ७१ किलो वजन प्रकारात ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. मुलींच्या २१ वर्षांखालील गटात दिशा कारंडे (५३ किलो) रौप्यपदकाची मानकरी ठरली. काजल जाधव (५० किलो), अंकिता शिंदे (५५ किलो) ब्रॉंझपदकाच्या मानकरी ठरल्या.

    कोल्हापूरातील कागल या एकाच शहरातील आणि योगायोगाने बंगळूरमध्ये बॉईज स्पोर्टस कंपनीमध्ये निवडले गेलेल्या अमोल आणि अक्षय यांच्यातच ५१ किलो वजन प्रकारातील अंतिम लढत झाली. मराठा लाईन इन्फंट्रीमध्ये एकत्र असणा-या या मित्रांना एकमेकांच्या शैलीची, क्षमतेची चांगली ओळख होती. त्यामुळे सावध पवित्रा घेऊन झालेल्या या लढतीत अमोलने ३-१ अशी बाजी मारली. सुरवातीला ताबा मिळवत दोन गुण घेतल्यावर, दुस-या फेरीत कुस्ती बाहेर घेत एका गुणाची कमाई करत अमोलने सुवर्ण आपल्या नावावर केले. वेगवेगळ्या प्रशिक्षकांकडे सुरुवात करणारे अमोल, अक्षय आता बंगळूर येथे रणजित महाडिक यांच्याकडे मार्गदर्शन घेतात. सध्या तरी दोघांचेही आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याचे लक्ष्य आहे. अक्षयने तंत्रात कमी पडल्याचे मान्य करतानाच पहिल्या राष्ट्रीय पदकाचा आनंद झाल्याचे सांगितले.

    महाराष्ट्राच्या वल्लभ, संदीप, संतोष, बलराम अशा मल्लांनी आधी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. मात्र, त्यांना आगेकूच करण्यात अपयश आले. त्यानंतर रेपिचेजमध्येही ते प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राला जवळ येऊनही या पदकापासून दूर राहिल्याची खंत नक्कीच वाटत असेल.

    मुलींच्या ५३ आणि ५५ किलो वजन प्रकारात पाचच कुस्तीगीर असल्याने नॉर्डिक पद्धतीने झालेल्या या वजन प्रकारातील लढतीत अनुक्रमे दिशा रौप्य आणि अंकिता ब्रॉंझपदकाच्या मानकरी ठरल्या.बहिणीकडून घेतली प्रेरणा - अंकिता    आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर असलेली बहिण स्वाती ही अंकिताचे प्रेरणास्थान. स्वाती कुस्तीचे धडे गिरवत असताना अंकिता सेमी इंग्लिश माध्यमातून आपले शिक्षण घेत होती. शिक्षणाची गाडी रुळावर असताना प्रथमच राष्ट्रीय शालेय स्पर्धा जिंकून आलेल्या बहिण स्वातीची गावात काढलेली मिरवणूक अंकिताच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. मिरवणूक संपत असतानाच जिपमधून उतरलेल्या प्रशिक्षक लवटे यांना म्हणाली मलाही कुस्ती शिकायची आहे. अंकिता नुसतीच म्हणाली नाही, तर दुस-या दिवसापासून केंद्रात दाखल झाली आणि सरावाला सुरुवात केली. आता बी. ए.च्या पहिल्या वर्षाला असली, तरी अंकितासाठी कुस्तीच सर्व काही आहे. आधी कुस्ती, मग शिक्षण असे तिचे सूत्र असून आंतरराष्ट्रीयस्तरावर चमकण्याचे उद्दिष्ट ती बाळगून आहे.

* मुष्टीयुद्धात महाराष्ट्राची घोडदौड    महाराष्ट्राच्या १९ खेळाडूंनी उपांत्य फेरीत स्थान मिळवित मुष्टीयुद्धात पदकांच्या दिशेने वाटचाल केली. मुलांच्या १७ वर्षाखालील गटात  सुरेश विश्वनाथ (४६ किलो), राज पाटील व संजीतसिंग (४८ किलो), विजयसिंग (५० किलो), सायकोमसिंग (५२ किलो), आदित्य गौड व याईफाबा मैतई (५४ किलो), जयदीप रावत व कुणाल घोरपडे (६६ किलो) यांनी उपांत्य फेरी गाठली. मुलींच्या १७ वर्षांखालील गटात जान्हवी चुरी  व देविका घोरपडे (४६ किलो), दिशा पाटील (६३ किलो), शर्वरी कल्याणकर (७० किलो) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या २१ वर्षांखालील गटात पूनम कैथवास (६० किलो) हिने उपांत्य फेरीत स्थान मिळविले. मुलांच्या २१ वर्षांखालील गटात भावेश कट्टीमणी व संकेत गौड (५२ किलो), आकाश गोरखा (६० किलो) व प्रसाद परदेशी (६९ किलो) यांनी उपांत्य फेरीकडे वाटचाल केली.

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाWrestlingकुस्तीMaharashtraमहाराष्ट्र