शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राचा संघ अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 16:50 IST

महाराष्ट्राने उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशाचे आव्हान ३८-२० असे सहज संपुष्टात आणले.

गुवाहटी : महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील संघाने तिस-या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी उत्तर प्रदेशाचे आव्हान ३८-२० असे सहज संपुष्टात आणले. अन्य एका उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलांना मात्र स्पर्धेत वर्चस्व राखल्यानंतरही अखेरीस राजस्थानकडून ५१-५५ असा पराभव पत्करावा लागला.

    लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक संस्थेच्या संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी महाराष्ट्राच्या युवकांनी आपल्या जबरदस्त खेळाचे प्रदर्शन कायम ठेवले. पंकज मोहितेचा व्यावसायिक अनुभव, अस्लम इनामदारच्या आक्रमक चढाया आणि सौरभ पाटिलचे नेतृत्वाला बचावाची मिळालेली भक्कम तटबंदी महाराष्ट्राच्या वर्चस्वाचे वैशिष्ट्य ठरले.

    पहिल्या चढाईपासून अस्लमला लय गवसली. त्यानंतर संपूर्ण सामन्यात त्याने आपल्या भोवती सामना फिरवला. डू ऑर डाय चढाईत त्याने राखलेले सातत्य कमालीचे होते. खोलवर चढाया करताना पंकजने मिळविलेले बोनस महाराष्ट्राचे गुण वाढवत होते. या सगळ्या वाटचालीत सौरभ कर्णधार या जबाबदारीत सहका-यांना एक ठेवत होता. या सगळ्यांवर शुभम शिंदे, राजू काथोरे, अजित पाटिल आणि वैभव गरजे यांची बचावाची भिंत अखेर पर्यंत भक्कम राहिली. त्यामुळेच मध्यंतराच्या २२-९ अशा मोठ्या आघाडीनंतर महाराष्ट्राच्या युवकांचा ३८-२० असा मोठा विजय साकार झाला.

अतिआत्मविश्वास नडला    महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील संघाला मात्र अतिआत्मिवश्वास महागात पडला. मध्यंतराला २१-१३  अशा आघाडीनंतर महाराष्ट्राला सामना खेळता आला नाही. अखेरच्या तीन मिनिटात चढाई, बचाव असे सगळे सुरळीत चालू असताना ३८-३३ ही आघाडी महाराष्ट्राला राखता आली नाही. आधुनिक थर्ड रेडच्या नियमाचा त्यांना वापर करता आला नाही आणि त्यांनी सामना निष्कारण ४४-४४ असा बरोबरीत सोडवला. त्यानंतरच्या तीन मिनिटांच्या टायब्रेकरमध्येही ४९-४७ ही आघाडी टिकविता आली नाही. त्या वेळी शुभमला बोनस गुण घेतल्यावर मागे फिरणे जमले नाही. त्याने टच पॉईंट घेण्याच्या नादात आपला बळी दिला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हातातील सामना राजस्थानकडे झुकला. त्यांनी ही संधीचा उपयोग घेत टायब्रेकरमध्ये बाजी मारली.

सुवर्णपदकासाठी महाराष्ट्रासमोर हरियाणाचे आव्हान    महाराष्ट्राच्या युवकांसमोर आता सुवर्णपदकासाठी हरियाणाचे आव्हान असेल. त्यांनी देखील रंगतदार झालेल्या सामन्यात चंडिगडचे आव्हान ३९-३९ अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये ४४-४२ असे मोडून काढले.

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाKabaddiकबड्डीMaharashtraमहाराष्ट्र