शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

खेलो इंडिया २०२० : महाराष्ट्राचे जिम्नॅॅस्टिक्स, कबड्डी, व्हॉलीबॉलचे संघ गुवाहाटीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 21:27 IST

जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला वर्चस्वाची संधी ; खेलो इंडिया युथ गेम्स २०२०

पुणे: आसामच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या खेलो इंडिया २०२० युथ गेम्स महोत्सवातील जिम्नॅस्टिक्स, कबड्डी व व्हॉलिबॉल या स्पर्धांना आजपासून (दि.९) प्रारंभ होत आहे. जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला किमान दोन डझन पदकांची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक्स, कबड्डी व व्हॉलिबॉल या संघांसह टेबलटेनिस व इतर काही खेळांमधील खेळाडूंचे गुवाहाटी येथे आगमन झाले आहे.

 

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गतवर्षी पुण्यात झालेल्या महोत्सवात जिम्नॅस्टिक्समध्ये मुले व मुली या दोन्ही गटांमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजविले होते. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. यावेळी महाराष्ट्राची मदार प्रामुख्याने रिद्धी व सिद्धी हात्तेकर या भगिनी, अश्विनी बडदे, श्रेया बंगाळे, रिचा चोरडिया, आदिती दांडेकर, अनन्या सोमण, दिव्याक्षी म्हात्रे आदी खेळाडूंवर आहे. गुरुवारी कलात्मक जिम्नॅस्टिक्सला प्रारंभ होईल. रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या स्पर्धा शुक्रवारपासून सुरु  होणार आहेत. 

कबड्डीमध्ये महाराष्ट्राचा महिला संघ यंदा नसला तरीही पुरुष खेळाडूंकडून महाराष्ट्राला विजेतेपदाची अपेक्षा आहे. महाराष्ट्राचा कर्णधार पंकज मोहिते याच्यासह सहा खेळाडू प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळलेले आहेत. त्याचा फायदा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली तयारी केली आहे. त्यांना अंतिम चार क्रमांकांमध्ये स्थान मिळविण्याची हुकमी संधी आहे. 

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्याचे आयुक्त ओम प्रकाश बकोरीया, उपसंचालक  सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले महाराष्ट्राचे मुख्य पथक प्रमुख आणि पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, मुंबईच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, वाशिमचे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिया, औरंगाबादचे जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, कोल्हापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे तसेच सर्व संघांचे क्रीडा मार्गदर्शक गुवाहाटीत दाखल झाले आहेत. 

दरम्यान, स्पर्धेच्या अंतिम तयारीस वेग आला आहे. बुधवारी आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी स्वत: येऊन मुख्य स्टेडियमची पाहणी केली. तसेच त्यांनी स्पर्धेच्या संयोजनात महत्वाचा दुवा असलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. मुख्य स्टेडियममध्ये जलतरण व अ‍ॅथलेटिक्स या महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. स्पधेर्चे बोधचिन्ह, तसेच स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Khelo India 2019खेलो इंडिया 2019Khelo Indiaखेलो इंडियाMaharashtraमहाराष्ट्र