नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांत निर्माण झालेल्या कमालीच्या तणावाची छाया खेळाच्या मैदानावरही पडली असून, येत्या शुक्रवारपासून अहमदाबादमध्ये सुरू होणाऱ्या कबड्डीच्या विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तान संघाला वगळण्याच्या निर्णयाने ही स्पर्धा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष देवराज चतुर्वेदी म्हणाले, ‘सध्याच्या तणावाच्या वातावरणात दोन्ही देशांच्या हितासाठी पाकला वगळण्यात येत आहे.’ पाकिस्तान कबड्डी महासंघाचे सचिव राणा मुहम्मद सरवर म्हणाले की, ‘हा अन्याय आहे. तणावाचे कारण असलेल्या दोन्ही देशांचे संघ वगळायला हवेत.’ ३५ देशांमध्ये कबड्डी खेळली जात असली, तरी हा खेळ मूळचा भारतीय उपखंडातील आहे. भारत व पाकिस्तान हे यातील मातब्बर संघ असून, त्यांच्यातील ‘ठसन’ पाहायलाही क्रीडाप्रेमी उत्सुक होते. (वृत्तसंस्था)
कबड्डी वर्ल्डकपमधून पाकला वगळले
By admin | Updated: October 6, 2016 05:54 IST