शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी : विजय क्लबची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 23:36 IST

अमर क्रीडा मंडळाने मध्यांतरातील १९-२५अशा ६गुणांच्या पिछाडीवरून साऊथ कॅनरा क्लबचा ४०-३४असा पाडाव करीत पुढची फेरी गाठली.

मुंबई : विजय क्लब, अमर मंडळ, शिवशक्ती मंडळ यांनी वंदे मातरम् क्रीडा मंडळने आपल्या "अमृत महोत्सवी वर्षानिमित्त" आयोजित प्रथम श्रेणी पुरुष गट कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. भोईवाडा-परेल येथील सदाकांत ढवण मैदानात आज पासून सुरू झालेल्या उदघाटनिय सामन्यात विजय क्लबने शिवनेरी मंडळाचा ४२-२६असा पराभव करीत विजयी सलामी दिली. मध्यांतरापर्यंत चुरशीनें खेळल्या गेलेल्या या सामन्यात विश्रांतीला विजयकडे १८-१६अशी छोटीशी आघाडी होती. अभिषेक रामाणे,विजय दिवेकर, रोशन थापा यांनी मध्यांतरानंतर आपला खेळ गतिमान करीत हा विजय साकारला. शिवनेरीकडून निखिल जाधव, नितेश यांनी चांगला खेळ केला.

दुसऱ्या सामन्यात अमर क्रीडा मंडळाने मध्यांतरातील १९-२५अशा ६गुणांच्या पिछाडीवरून साऊथ कॅनरा क्लबचा ४०-३४असा पाडाव करीत पुढची फेरी गाठली. अमन शेख,अविनाश थोरवे यांच्या चतुरस्त्र खेळामुळे साऊथ कॅनराने विश्रांती पर्यंत ६गुणांची आघाडी आपल्याकडे राखण्यात यश मिळविले होते.पण ती त्यांना राखण्यात अपयश आले. उत्तरार्धात अमरच्या सिद्धेश पांचाळ, नितीन विचारे यांनी टॉप गिअर टाकत ही आघाडी मोडून काढली आणि ६गुणांनी संघाला विजयी करीत दुसरी फेरी गाठली. शेवटच्या सामन्यात शिवशक्तीने वीर बजरंग कबड्डी संघाचा ४६-२७असा सहज पराभव करीत आगेकूच केली. शिवशक्तीकडून विराज सोनी, दीपक शिंदे,तर वीर बजरंग कडून निखिल शिंदे यांचा खेळ उत्तम होता. 

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबई