शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

कबड्डी : जय भारत मंडळ दुसऱ्या फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 23:13 IST

दुर्गामाता स्पोर्ट्सने चुरशीच्या लढतीत गुड मॉर्निग स्पोर्ट्सचा ३२-२८असा पाडाव केला.

मुंबई : वंदे मातरम् क्रीडा मंडळाने आपल्या "अमृत महोत्सवी वर्षानिमित्त" आयोजित केलेल्या प्रथम श्रेणी स्थानिक गट कबड्डी स्पर्धेत गोलफादेवी, दुर्गामाता, जय भारत यांनी दुसऱ्या फेरीत धडक दिली. आहता प्रोडक्शन पुरस्कृत नायगाव-भोईवाडा येथील सदाकांत ढवण मैदानात सुरू असलेल्या पुरुष गटाच्या सामन्यात गोलफादेवी सेवा मंडळाने एच जी एस स्पोर्ट्सचा ३९-१९असा सहज पाडाव केला. पूर्वार्धात १८-११अशी आघाडी घेणाऱ्या गोलफादेवीने उत्तरार्धात आणखी जोशपूर्ण खेळ करीत २०गुणांच्या मोठ्या फरकाने हा विजय मिळविला. अक्षय बिडू, साईल हरचकर यांच्या चढाई-पकडीच्या झंजावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. एच जी एस च्या ओंकार जाधव, तेजस गायकवाड यांनी पूर्वार्धात चांगली चमक दाखविली, पण उत्तरार्धात ते कमी पडले.

दुर्गामाता स्पोर्ट्सने चुरशीच्या लढतीत गुड मॉर्निग स्पोर्ट्सचा ३२-२८असा पाडाव केला. शशिकांत पाटील, प्रणय भादवणकर, सौरभ पाटील यांनी पूर्वार्धात चतुरस्त्र खेळ करीत विश्रांतीपर्यंत गुड मॉर्निंगला १६-११अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. पण ती त्यांना राखता आली नाही. उत्तरार्धात दुर्गामाताच्या प्रथमेश पालांडे, आशिष पाले, सौरभ चव्हाण यांनी जोरदार आक्रमण व भक्कम बचाव करीत संघाला ४गुणांनी विजय मिळवून दिला.शेवटच्या सामन्यात जय भारत सेवा मंडळाने अमरहिंदला ३६-२०असे नमवित आगेकूच केली. जय भारतच्या विनायक व ओमकार या मोरे बंधूंने दोन्ही डावात चतुरस्त्र खेळ करीत हा विजय सोपा केला. अमरहिंदचा दिनेश बापार्डेकर बरा खेळला.

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबई