शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

ज्योतीला सीएफआयतर्फे मिळणार चाचणीची संधी, सायकलिंग महासंघाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 06:25 IST

ज्योतीने वडिलांना सायकलवर बसवून एक हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर आठ दिवसात पूर्ण केले होते. ज्योतीने दररोज १०० ते १५० किमी सायकलिंग केले.

नवी दिल्ली : कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात गुरुग्राम ते दरभंगा असा वडिलांना घेऊन डबलसिट सायकल प्रवास करणाऱ्या ज्योतीच्या क्षमतेची दखल घेत भारतीय सायकलिंग महासंघाने (सीएफआय) तिला चाचणीची संधी देण्याचे ठरवले आहे. सीएफआय संचालक व्ही.एन. सिंग यांनी ज्योती सीएफआयच्या नियमानुसार सक्षम असल्यास विशेष सराव आणि कोचिंग दिले जाईल, असे म्हटले आहे.ज्योतीने वडिलांना सायकलवर बसवून एक हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर आठ दिवसात पूर्ण केले होते. ज्योतीने दररोज १०० ते १५० किमी सायकलिंग केले. महासंघ नेहमी क्षमतावान खेळाडूंच्या शोधात असतो. ज्योतीमध्ये क्षमता असल्यास आम्ही तिची पूर्ण मदत करू, असे सिंग यांनी सांगितले. ज्योतीसोबत माझे बोलणे झाले असून लॉकडाऊननंतर तिला दिल्लीला बोलविणार आहे. इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ज्योतीची पाच मिनिटे चाचणी घेतली जाईल. यामुळे खेळाडूच्या पायातील क्षमतेचा वेध घेता येतो. १४-१५ वर्षांच्या मुलीकडून दररोज १०० ते १५० किमी सायकल प्रवास सहज शक्य नसतो. ज्योतीचे वडील गुरुग्राममध्ये रिक्षा चालवायचे. कोरोनामुळे जगायचे कसे हा प्रश्न पडला तेव्हा ज्योतीने वडिलांना घेऊन दरभंगा येथे पोहोचण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. स्वत:च्या घरी विलगीकरणात असलेल्या ज्योतीने चाचणीची संधी मिळणार असेल तर आपण सज्ज असल्याचे म्हटले आहे.सायकल महासंघाकडून फोन आला होता. मी सध्या थकले आहे. लॉकडाऊननंतर संधी मिळाल्यास मी चाचणीत सहभागी होईल.मी यशस्वी ठरल्यास सायकलिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे आवडेल. कुटुंबात तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. गरिबीमुळे मी दहावीचा अभ्यास सोडून दिला. संधी मिळाली तर पुन्हा शिकायला आवडेल. - ज्योती

टॅग्स :Cyclingसायकलिंगcorona virusकोरोना वायरस बातम्या