शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

जेएमडीवायसी पिकलबॉल: मुंबईकर गौरव राणे, कश्यप बरनवाल यांनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 05:18 IST

मिश्र दुहेरीत औरंगाबादकरांचे वर्चस्व

मुंबई : कोणतीही घाई न करता संयम आणि आक्रमकतेचा योग्य ताळमेळ साधत गौरव राणे आणि कश्यप बरनवाल या मुंबईकरांनी जेएमडीवायसी खुल्या पिकलबॉल स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. मिश्र दुहेरीत करिष्मा-क्रिष्णा मंत्री या औरंगाबादच्या खेळाडूंनी बाजी मारली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सहसचिव नामदेव शिरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये विजेत्यांना गौरविण्यात आले. जल मंगल दीप यूथ क्लब (जेमडीवायसी) व रोट्रॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि अखिल भारतीय पिकबॉल संघटना (एआयपीए) व अमॅच्युअर पिकलबॉल फेडरेशन यांच्या मान्यतेने ही बांगुर नगर (गोरेगाव) येथे ही स्पर्धा पार पडली. विलेपार्लेच्या प्रबोधनकार क्रीडा ठाकरे संकुलाच्या (पीटीकेएस) गौरव-कश्यप यांनी मिहिर खंडेलवाल व प्रणव धोईफोडे यांना सरळ दोन सेटमध्ये ११-९, ११-८ असे नमवले. मिश्र दुहेरीत करिष्मा-क्रिष्णा मंत्री या औरंगाबादच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. निखिल सिंग राजपूत-शिव कंवर या राजस्थानच्या संभाव्य आणि कसलेल्या जोडीविरुद्ध कोणत्याही दडपणाव्यतिरिक्त खेळत ११-७, ११-६ असा धक्कादायक विजय मिळवला.  त्याचप्रमाणे, ४० वर्षांवरील गटात मिहिर खंडेलवाल आणि नोझर अमाल्सादिवाला या मुंबईकरांनी आक्रमक खेळ करताना संदीप तावडे आणि अशोक नथानी या मीरा रोडच्या खेळाडूंचा ११-७, ११-६ असा सहज पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.राजस्थानचीही छाप१६ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात राजस्थानच्या तन सिंग शेखावत - अभिमन्यू शेखावत यांनी जेतेपद पटकावताना यश गायकवाड-तेजस गायकवाड या औरंगाबादच्या खेळाडूंना ९-११, ११-८, ११-७ असे नमवले. १६ वर्षांखालील मुलींमध्ये सम्राज्ञी परदेशी-कोमल राजदेव यांनी बाजी मारत सौम्या लेले-आर्या कोकाटे यांचा १५-४ असा एकतर्फी पराभव केला.