शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

जितू रायची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

By admin | Updated: August 18, 2016 01:34 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या जीतू राय याची प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. जीतूने गत दोन वर्षांत पिस्टल

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या जीतू राय याची प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. जीतूने गत दोन वर्षांत पिस्टल नेमबाजीत शानदार कामगिरी केली आहे; परंतु रिओ आॅलिम्पिकमध्ये तो पदक जिंकू शकला नाही. जीतू राय याच्या नावाची शिफारस केल्याविषयी भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे सचिव राजीव भाटिया यांनी दुजोरा दिला. २९ वर्षीय राय पुरुषांच्या १0 मीटर एअर पिस्टल प्रकारात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे आणि तो रिओत फायनलमध्ये पोहोचणाऱ्या दोन भारतीय नेमबाजांपैकी एक होता. त्याच्याशिवाय अभिनव बिंद्रानेदेखील अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.राय पुरुषांच्या १0 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत फायनलमध्ये पोहोचला होता व त्याला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तथापि, रियोत आपली आवडती स्पर्धा ५0 मीटर पिस्टलच्या फायनलसाठी तो पात्र ठरू शकला नव्हता. खेलरत्न हा देशातील सर्वात मोठा खेळातील पुरस्कार आहे.यावर्षी रायने आयएसएसएफ विश्वकप १0 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर बँकॉकमध्ये आयएसएसएफ विश्वकप ५0 मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. राय २0१४ मध्ये स्पेन येथे नेमबाजी विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला नेमबाज होता. रायफल संघटनेची शिफारस मंजूर झाल्यास या नेमबाजाला २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडादिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल. आतापर्यंत खेलरत्न पुरस्कार नेमबाजीत आॅलिम्पिकम सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा आणि रंजन सोढी याला मिळाला होता. (वृत्तसंस्था)