शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

जिगरबाज युवराज !

By admin | Updated: January 20, 2017 07:42 IST

देश, काल आणि परिस्थिती यांच्यासमोर सर्वांनाच शरण जावे लागते.

- बाळकृष्ण परबदेश, काल आणि परिस्थिती यांच्यासमोर सर्वांनाच शरण जावे लागते. त्यांच्यासमोर कुणीच टिकत नाहीत, असे म्हटले जाते. पण काही माणसं मात्र वेगळीच असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अजबच रसायनाचा मिलाफ झालेला असतो, ज्याच्या जोरावर ही मंडळी आपल्यासमोरील परिस्थितीवर लिलया मात करतात. अशा मोजक्या जिगरबाज माणसांपैकी एक म्हणजे युवराज सिंग. काल इंग्लंडविरुद्ध कठीण परिस्थितीत केलेल्या झंझावाती खेळीनंतर युवी पुन्हा चर्चेत आलाय. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. युवीचा एकेकाळचा सहकारी आणि सध्याचा आघाडीचा समालोचक वीरेंद्र सेहवागच्या भाषेत सांगायचं तर जो कॅन्सरला हरवू शकतो, त्याच्यासमोर इंग्लंडचे गोलंदाज काय चिज! खरंच, युवीच्या या जिगरबाजपणाला दाद द्यावी तितकी थोडीच! खरंच आहे ते, क्रिकेटपटू म्हणून युवराजने केलेली कामगिरी जेवढी कौतुकास्पद आहे, तेवढाच कदाचित त्याहून अधिक त्याने कॅन्सरशी दिलेला लढा लोकांसाठी प्रेरणादायी आहे. २०११ साली युवी विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. पण यशोशिखरावर असतानाच त्याला कॅन्सर असल्याचे निदान झाले. एखाद्यासाठी इथे सर्व काही संपले असते. कुणी आजारातून सावरले असते, पण खेळाच्या मैदानात परतण्याचा विचारच केला नसता, पण गंभीर आजार आणि वेदनादायी उपचार या सर्वांवर मात करून वर्षभरातच क्रिकेटच्या मैदानात उतरला होता.खरंतर युवीचा जन्म एका क्रिकेटपटूच्या सुखवस्तू कुटुंबातला. पण त्याच्या जन्मानंतर काही वर्षांतच त्याची आई शबनम सिंग आणि वडील योगराज सिंग एकमेकांपासून वेगळे झाले. हा मानसिक आघात पेलून युवी लहानाचा मोठा झाला. दरम्यान, वडिलांच्या पावलावर पावले टाकत क्रिकेटच्या मैदानात आलेल्या युवीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्याआल्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८४ धावांची खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पण कामगिरीत सातत्य राखणे मात्र त्याला कधीच जमले नाही. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच संघातून आत-बाहेर होणं, त्याच्या सवयीचे झाले. तरीही तो जेव्हा जेव्हा खेळला तेव्हा त्याची लढाऊ वृत्ती मात्र वेळोवेळी दिसून आली. मग ते २००२ साली झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील शेवटचे दोन सामने असोत वा त्याचवर्षी लॉर्डस् वर इंग्लंडविरुद्ध झालेली नॅटवेस्ट ट्रॉफीचीऐतिहासिक फायनल असो, त्याने वेळोवेळी आपल्यातील लढावू वृत्तीचे दर्शन घडवले आहे. भारतीय संघ अडचणीत असताना युवीची बॅट हमखास चालते. २००४ साली व्हीबी तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका लढतीत आघाडीचे रथी महारथी गडगडल्यावर युवीने १३९ धावांची खेळी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. युवी कसोटी क्रिकेटमध्ये कधीच रुळला नाही. पण २००७ साली पाकिस्तानविरुद्धच्या तिस-या कसोटीत त्याने १६९ धावांची खेळी करताना सौरव गांगुलीसोबत त्रिशतकी भागीदारी रचली होती. मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंशी पंगे घेणं आणि त्यांचे डाव त्यांच्यावरच उलटवणं यातही युवीचा हात कुणी धरू शकत नाही. ट्वेंटी-२० विश्वचषकात फ्लिंटॉफने पंगा घेतल्यावर युवीने स्टुअर्ट ब्रॉडला दिलेला मार इंग्रज अजूनही विसरले नसतील. २०११ च्या विश्वचषकातील त्याची कामगिरी तर बावनकशीच! पण कॅन्सरमधून सावरल्यानंतर तो जुना युवी कुठेतरी हरवला. त्याने संघात पुनरागमन केले, पण जुना फॉर्म त्याला कधीच दाखवता आला नाही. त्यामुळे निवड समितीने वनडे संघासाठी त्याच्या नावाचा विचार करणे बंद केले. ट्वेंटी-२० तही त्याचा फॉर्म तितकासा चांगला नव्हता. २०१४ च्या विश्वचषकातील अंतिम लढतीत केलेल्या कासवछाप खेळीमुळे तो टीकेचा धनी झाला. संघातले स्थानही त्याला गमवावे लागले. पण त्यातून सावरत गतवर्षी युवीने पुन्हा ट्वेंटी-२० संघात पुनरागमन केले. यंदाच्या रणजी हंगामातही त्याने दणदणीत खेळी केल्या. त्याच्या जोरावर वनडे संघात स्थानही मिळवले. पण युवीच्या संघात झालेल्या निवडीवर टीकाही झाली. या मालिकेत अपयशी ठरला असता तर त्याच्या संघातील निवडीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले असते. साहजिकच युवीवर दबाव होता. पण अशा परिस्थितीतही त्याने काल दबाव झुगारून खेळ केला. संघ संकटात असताना जिगरबाज खेळाचे प्रदर्शन घडवले. भारतीय फलंदाजांना जखडण्यासाठी इंग्लिश गोलंदाजांकडून शॉर्ट चेंडूंचा मुक्तहस्ते मारा झाला. पण फॉर्मात आलेल्या युवीसमोर त्यांची ही रणनीती अगदीच 'शॉर्ट' ठरली. या खेळीमध्ये त्याने कट आणि पुलचे जे जबरदस्त फटके मारले, ते पाहून सात आठ वर्षांपूर्वीच्या युवीची आठवण ताजी झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्ण तंदुरुस्त आणि परिपक्व युवी काल पाहायला मिळाला. त्यामुळे पुढच्या काही काळात त्याच्या बॅटकडून अशाच धमाकेदार खेळींची अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.