विशाखापट्टणम : अॅडम झम्पा आणि अशोक डिंडा यांच्या भेदक माऱ्यापुढे दिल्ली डेअरडेव्हिल्सची बुधवारी आयपीएल साखळी लढतीत रायजिंग पुणे सुपरजायन्टस्विरुद्ध पुरती दाणादाण झाली. २० षटकांत दिल्ली संघ केवळ ६ बाद १२१ धावा उभारु शकला. झम्पाने चार षटकांत २१ धावा देत तीन तसेच डिंडाने चार षटकांत २० धावा देत तीन गडी बाद केले. दिल्लीकडून तिसऱ्या स्थानावर आलेला करुण नायर हाच सर्वाधिक ४१ धावा काढण्यात यशस्वी ठरला. अन्य फलंदाजांना धावा काढण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. जेपी ड्यूमिनी १४ आणि संजू सॅम्सन १० धावा काढून बाद झाले. अखेरच्या काही षटकांत ख्रिस मॉरिस याने २० चेंडूत चार चौैकार आणि दोन षटकारांसह नाबाद ३८ धावांची खेळी करीत दिल्लीला धावांचे शतक गाठून दिले. प्ले आॅफच्या शर्यतीतून आधीच बाद झालेल्या पुण्याचा कर्णधार महेंद्रसिंग याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गमविण्यासारखे काहीच नसल्याने पुण्याच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच वर्चस्वपूर्ण मारा करीत दिल्लीच्या फलंदाजांच्या फटकेबाजीवर अंकुश लावला. २० षटके संपेपर्यंत दिल्लीला यातून सावरणे कठीण गेले.(वृत्तसंस्था)>संक्षिप्त धावफलकदिल्ली डेअरडेव्हिल्स २० षटकांत ६ बाद १२१ धावा.(नायर ४१, ख्रिस मॉरिस नाबाद ३८; डिंडा ३-२०, झम्पा ३-२१).
झम्पा, डिंडाचा अचूक मारा
By admin | Updated: May 18, 2016 06:01 IST