Jeremy Struck Young World Record | जेरेमीने रचला युवा विश्वविक्रम
जेरेमीने रचला युवा विश्वविक्रम

आपिया (समोआ) : युवा आॅलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या जेरेमी लालरिनुंगाने गुरुवारी येथे युवा राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी तीन विक्रमे मोडली; परंतु तो क्लीन अँड जर्कमध्ये वजन उचलू शकला नाही.
१६ वर्षीय जेरेमीने सुरेख कामगिरी करताना ६७ किलो वजन गटात स्नॅचमध्ये १३६ किलो वजन उचलताना युवा विश्व, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रम मोडला. याआधीचाही युवा विश्व आणि आशियाई विक्रम जेरेमीच्याच नावावर होता. त्याने एप्रिल महिन्यात चीनच्या निग्बो येथे १३४ किलो वजन उचलले होते.
जेरेमी क्लीन अँड जर्कमध्ये मात्र वजन उचलू शकला नाही. त्यामुळे त्याने उचलले एकूण वजन खूप कमी राहिले. ही गोल्ड दर्जाची आॅलिम्पिक पात्रता स्पर्धा असून याचे गुण टोकियो आॅलिम्पिकच्या अंतिम रँकिंग कटमध्ये उपयोगात येतील.
अचिंता श्युलीने सिनिअर व ज्युनिअर पुरुषांच्या ७३ किलो वजन गटात एकूण ३०५ (१३६ व १६९ किलो) वजन उचलत सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या ७६ किलो वजन गटात मनप्रीत कौरने २०७ किलो वजन (९१ व ११६) उचलताना सुवर्णपदक आपल्या नावावर केले.


Web Title: Jeremy Struck Young World Record
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.