शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

जालिंदर आपकेने पटकावला "परळ श्री"चा किताब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 16:23 IST

परळच्या जालिंदर आपकेने गतविजेत्या सुशील मुरकरचे कडवे आव्हान मोडित काढत "परळ श्री"चा मान पटकावला.

मुंबई : परळच्या जालिंदर आपकेने गतविजेत्या सुशील मुरकरचे कडवे आव्हान मोडित काढत "परळ श्री"चा मान पटकावला. गेल्यावर्षापासून सुरू झालेली "परळ श्री " स्पर्धा टॉप टेन असली तरी 56खेळाडूंनी आपली उपस्थिती नोंदविली. इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धक परळ श्रीला उतरल्यामुळे मनीष आडविलकरने तात्काळ टॉप टेन ऐवजी टॉप 20 खेळाडूंना रोख पुरस्कार जाहीर केले. आधी 56 खेळाडूंमधून 30 खेळाडू निवडण्यात आले. मग त्यातून 20 खेळाडूंची निवड करण्यात आली . त्यानंतर 20 मधून टॉप टेन जाहीर करण्यापूर्वी उर्वरित 10 खेळाडूंना मनीषने सन्मानित केलं.

टॉप टेनमधल्या पहिल्या सहा खेळाडूंमध्ये चांगलीच चुरस दिसली. गेल्यावर्षी मुंबई श्री झालेला सुजन पिळणकर पाचवा आला. यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की स्पर्धा किती तगडी होती ती. या शर्यतीत सुशांत पवार चौथा तर दीपक तांबीटकर तिसरा आला. तेव्हा परळ श्री विजेत्याच्या नावाची उत्कंठा अक्षरश: शिगेला पोहोचली होती. गतविजेता आणि महाराष्ट्र श्री च्या 85 किलो वजनी गटात सुवर्ण कामगिरी करणाऱया सुशील मुरकरकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण गेल्या महिन्याभरापासून प्रशिक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करत असलेल्या जालिंदर आपकेने मुरकरवर मात केली. पुन्हा एकदा चव्हाणांच्या शिष्याने त्याला पराभवाचा धक्का दिला. महिन्याभरापूर्वी चव्हाणांच्याच अनिल बिलावाने मुरकरकडून मुंबई श्रीचे संभाव्य जेतेपद हिसकावून घेतले होते. तीन भारत श्री एकाच मंचावरशरीरसौष्ठवपटूंसाठी आयडॉल असलेले सुहास खामकर आणि श्याम रहाटे अनेक वर्षानंतर एकाच मंचावर दिसले. शरीरसौष्ठव संघटनांमध्ये असलेल्या वादामुळे गेले काही वर्षे सुहास खामकर वेगळ्या संघटनेकडून खेळतोय तर त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या श्याम रहाटेने आता स्पर्धात्मक शरीरसौष्ठवातून जवळजवळ निवृत्ती घेतलीय. आठ-दहा वर्षापूर्वी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या हा दोघा भारत श्री विजेत्यांना परळ श्रीच्या निमित्ताने मनीष आडविलकरने एका मंचावर आणण्याचे धाडस दाखवले. तसेच आशिया श्री सुनीत जाधवने या दोघांमध्ये एण्ट्री केल्यामुळे शरीरसौष्ठवाचे स्टार परळ श्रीच्या मंचावर एकाच क्षणी अवतरले. विशेष म्हणजे तिघेही जबरदस्त तयारी होते.त्यांच्या सोबतीला प्रवीण सकपाळ आणि प्रशांत जाधव हे दिग्गज शरीरसौष्ठवपटूही होते.

परळ श्रीचे शरीरसौष्ठव स्पर्धेचे टॉप टेन विजेतेः1. जालिंदर आपके ( हर्क्युलस फिटनेस), 2. सुशील मुरकर (आरकेएम), 3. दीपक तांबीटकर (रिजस फिटनेस), 4. सुशांत पवार ( बॉडी गॅरेज), 5. सुजन पिळणकर (परब फिटनेस), 6. सुशांत रांजणकर ( आर. एम. भट), 7. राजेश तारवे ( शाहूनगर व्यायामशाळा), 8. अर्जुन कुंचिकुरवे ( गुरूदत्त व्यायामशाळा), 9. अमोल गायकवाड (रिसेट फिटनेस), 10. संदीप कवडे (एचएमवी फिटनेस).

परळ श्री फिटनेस फिजीकचे अव्वल सहा खेळाडूः1. रोहन कदम (आर. के. फिटनेस), 2. लवलेश कोळी (गुरूदत्त जिम), 3. निलेश गिरी(आर. के. फिटनेस), 4. मोहम्मद अन्सारी ( आय फ्लेक्स), 5. अनिकेत चव्हाण (रिजस फिटनेस), 6. सरवर अन्सारी (आर.एम.भट), 

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवMumbaiमुंबई