शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

जडेजाचे भारतीय संघात पुनरागमन

By admin | Updated: October 20, 2015 00:59 IST

अष्टपैलू रवींद्र जडेजाचे जवळजवळ १४ महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. बीसीसीआय राष्ट्रीय निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या

नवी दिल्ली : अष्टपैलू रवींद्र जडेजाचे जवळजवळ १४ महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. बीसीसीआय राष्ट्रीय निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जाहीर केलेल्या भारताच्या १६ सदस्यांच्या संघात केवळ एकमेव बदल करण्यात आला. त्याचवेळी अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगला मात्र पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडण्यात आलेले नाही. निवड समितीने अखेरच्या दोन वन-डे सामन्यांसाठी संघात एक बदल करताना उमेश यादवच्या स्थानी वेगवान गोलंदाज श्रीनाथ अरविंदची निवड केली. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी संघाची घोषणा केली. कसोटी मालिकेचा प्रारंभ ५ नोव्हेंबरपासून मोहालीमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे तर उर्वरित तीन सामने बेंगळुरू, नागपूर आणि दिल्ली येथे खेळल्या जातील. अष्टपैलू जडेजाने आॅगस्ट २०१४मध्ये शेवटचा कसोटी सामना इंग्लंड विरुध्द खेळला होता. याआधी श्रीलंका दौऱ्यात त्याला कसोटीत संधी मिळाली नव्हती तसेच टी-२० आणि वन - डे तूनही डच्चू मिळाला. दक्षिण आफ्रिकेविरुध्द सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत दुखापतग्रस्त आर. अश्विनच्या जागी अनुभवी हरभजनची वर्णी लागली, मात्र कसोटी संघात त्याची निवड झाली नाही. कसोटीत हरभजनच्या जागी जडेजाची निवड झाली. जडेजाने रणजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना पहिल्या दोन सामन्यात ८.२५च्या सरासरीने २४ बळी घेण्याचा पराक्रम केला. या कामगिरीनेच त्याने निवडसमितीचे लक्ष वेधले. वेगवान गोलंदाज इशांत शर्माचीही संघात वर्णी लागली असून एका सामन्याच्या बंदीमुळे तो पहिल्या कसोटीमध्ये खेळू शकणार नाही.एकदिवसीय संघामध्ये श्रीनाथ अरविंदचा अपवाद वगळता इतर दुसरा बदल दिसून आला नाही. वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या जागी त्याची निवड करण्यात आली. द. आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यात अरविंद खेळला होता.भारतीय संघ वन-डे संघ ( अखेरच्या दोन लढतींसाठी) :- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अक्षर पटेल, हरभजन सिंग, अमित मिश्रा, मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, एस. अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू आणि गुरकिरत मान.कसोटी संघ (पहिल्या दोन लढतीसाठी) :- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, लोकेश राहुल, स्टुअर्ट बिन्नी, वरुण अ‍ॅरोन आणि ईशांत शर्मा. बोर्ड अध्यक्ष इलेव्हन :- चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, उन्मुक्त चंद, करुण नायर, श्रेयस अय्यर, नमन ओझा, हार्दिक पांड्या, जयंत यादव, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, कर्ण शर्मा आणि शेल्डन जॅक्सन.