शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भारताची नेमबाज अपुर्वी चंडेलाचा विश्वविक्रमासह 'सुवर्ण' वेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 15:41 IST

नेमबाजीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या अपुर्वी चंडेलाने 10 मी एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले.

नवी दिल्ली :  येथे सुरू असलेल्या नेमबाजीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या अपुर्वी चंडेलाने 10 मी एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. अपुर्वीने 252.9 गुणांसहीत केला विश्वविक्रमाची नोंद केली.  घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना अपुर्वीने दोन फेऱ्या शिल्लक असताना 0.8 गुणांची आघाडी घेतली होती. चिनच्या झाओ रौझोने त्यानंतर 10.5 चा निशाणा साधला, परंतु अपुर्वीने त्याला 10.8च्या निशाण्याने प्रत्युत्तर देताना आघाडी 1.1 अशी वाढवली. अखेरच्या फेरीत अपुर्वीने 10.5 गुणांची कमाई करताना विश्वविक्रम नोंदवला. तिनो झाओच्या नावावर असलेला विक्रम मोडताना भारताच्या खात्यात सुवर्णपदक जमा केले.अपुर्वीची सुरुवात निराशाजनक झाली होती. पहिल्या फेरीनंतर ती सातव्या स्थानावर होती, परंतु तिने सातत्याने कामगिरीत सुधारणा केली आणि चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिचा एकही निशाणा 10 गुणांच्या खाली लागलाच नाही. सहाव्या फेरीनंतर ती अव्वल स्थानावर आली. त्यानंतर तिने सलग 10.6 व 10.8 गुणांना निशाणा साधला.  अंतिम फेरीत खेळणाऱ्या आठ नेमबाजांत 26 वर्षीय अपुर्वी ही सर्वात युवा खेळाडू होती. वर्ल्ड कप स्पर्धेतील तिचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. याआधी तिला 2015 मध्ये चँगवॉन येथे कांस्य, तर म्युनिच येथे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 

चिनच्या रौशू झाओ आणि हाँग झू यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. अपूर्वी आणि अंजूम मुदगील या भारतीय खेळाडूंनी 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता आधीच निश्चित केली आहे. त्यामुळे चीनी खेळाडूंना ऑलिम्पिकचे तिकिट मिळाले. 

टॅग्स :Shootingगोळीबार