शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल मनी लाँड्रिंग : ईडीचा सिंगापूर, मॉरिशसमध्ये तपास

By admin | Updated: July 1, 2015 02:50 IST

आयपीएलमधील आर्थिक अनियमितता आणि माजी आयुक्त ललित मोदी यांच्याविरुद्धचा मनी लाँड्रिंगचा तपास पुढे रेटणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)

नवी दिल्ली : आयपीएलमधील आर्थिक अनियमितता आणि माजी आयुक्त ललित मोदी यांच्याविरुद्धचा मनी लाँड्रिंगचा तपास पुढे रेटणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सिंगापूर आणि मॉरिशसकडे कायदेशीर मदत मागितली आहे. याविषयी न्यायालयात परवानगी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.२००९च्या आयपीएल स्पर्धेत मीडिया अधिकार देण्याच्या मोबदल्यात मोठ्या प्रामाणावर मनी लाँड्रिंग झाल्याची ईडीला शंका आहे. या संदर्भात ईडीच्या मुंबईस्थित झोनल कार्यालयाचे २ अधिकारी सिंगापूरला रवाना झाले. हे पथक अनेक महत्त्वपूर्ण दस्तावेज सोबत घेऊन गेले आहे. ईडीने विदेशी मुद्रा विनिमय उल्लंघनप्रकरणी (फेमा) अलीकडे बीसीसीआय, मोदी तसेच आयपीएलच्या अन्य अधिकाऱ्यांना व काही खासगी संस्थांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. यातील २ आरोपी कंपन्यांची कार्यालये या देशात आहेत. आर्थिक देवाणघेवाण तसेच आंतरराष्ट्रीय आर्थिक कराराची कागदपत्रे पडताळण्याचे काम हे पथक करणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी २०१०मध्ये चेन्नई पोलिसांकडे मोदी तसेच अन्य अधिकाऱ्यांविरुद्ध प्रसारण अधिकारापोटी मोठी रक्कम दडपल्याची व बीसीसीआयला फसविल्याची तक्रार केली होती. ईडीने याविषयी गुन्हे दाखल करून गुडगाव आणि दिल्लीत धाड टाकली होती. या चौकशीतील तपासाच्या आधारे इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस देऊन मोदी यांना ब्रिटनमधून भारतात आणू शकते, असेही संकेत ईडीकडून मिळाले होते. मोदी हे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यामार्फत विदेश वारीसंदर्भात लाभ मिळविल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. २००९च्या आयपीएलचे प्रसारण हक्क ४२५ कोटी विकल्याप्रकरणी त्यांच्यावर फेमा कायद्याचे उल्लंघन करणे व बनावट ई-मेलद्वारे १२५कोटी रुपयांचा अवैध फंडाचा संशयित लाभार्थी होणे, असा आरोप आहे. सहा वर्षे चौकशी केल्यानंतर ईडीने १४ लोकांसह काही कपन्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली. त्यांत ललित मोदी, श्रीनिवासन, आयपीएलचे सीईओ सुंदररमन, आयएमजीचे उपाध्यक्ष व बीसीसीआय आयपीएलचे कायदेशीर सल्लागार पॉल मॅनिंग, वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुप मॉरिशसचे अधिकारी, मल्टी स्क्रिन मीडिया सॅटेलाईट सिंगापूर यांचा समावेश आहे. बीसीसीआयने २००८मध्ये डब्ल्यूएसजीच्या सोनी वाहिनीला ९१ कोटी ८० लाख रुपयांत दहा वर्षांसाठी मीडिया प्रसारण हक्क विकले होते. हा करार वर्षभरानंतर नऊ वर्षांच्या कालावधीसाठी बदलण्यात आला होता. त्यासाठी मल्टी स्क्रिनने १ अब्ज ६३ कोटी डॉलर दिले. २००९मध्ये ईडीने आरोपांची चौकशी सुरू केली. एमएसएम सिंगापूरने डब्ल्यूएसजी मॉरिशसला ४२५ कोटींचा निधी अनधिकृत पद्धतीने दिल्याची माहिती असून, त्यात रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचेही उल्लंघन झाले, असा ईडीचा आरोप आहे.