आयपीएल 10 : दमदार राणा

By admin | Published: May 20, 2017 08:00 PM2017-05-20T20:00:38+5:302017-05-20T20:01:17+5:30

मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू नितीश राणा हा या आयपीएलमधून खरा लाईमलाईटमध्ये आला. २०१५ मध्ये त्याला मुंबई इंडियन्सने १० लाख रुपयांत खरेदी केले होते.

IPL 10: Dhamdar Rana | आयपीएल 10 : दमदार राणा

आयपीएल 10 : दमदार राणा

Next

ऑनलाईन लोकमत

- मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू नितीश राणा हा या आयपीएलमधून खरा लाईमलाईटमध्ये आला. २०१५ मध्ये त्याला मुंबई इंडियन्सने १० लाख रुपयांत खरेदी केले होते. मात्र त्या सत्रात त्याला खेळण्याची संधीच मिळाली नव्हती. 
 
२०१६ मध्ये देखील तो आरसीबी विरोधात खेळला, आपल्या पहिल्या सामन्यात त्याला फक्त ९ धावांची खेळी करता आली. मात्र आयपीएलचे हे सत्र नितीश राणासाठी महत्त्वाचे ठरले. या सत्रात त्याने ३३३ धावा केल्या आहे. मुंबई इंडियन्ससाठी धावा काढणाºया खेळाडूंच्या यादीत तो दुस-या स्थानावर आहे.
 
नितीश राणाने या पहिल्या सामन्यात पुणे विरोधात ३४ धावा केल्या. मुंबईला या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी राणाने आपल्या खेळीने संघ व्यवस्थपनाचे लक्ष वेधले. त्यानंतर केकेआर विरोधात २९ चेंडूत ५० धावा करत संघाला विजय मिळवून दिला. तिसºया सामन्यात सनरायजर्स विरोधात त्याने ४५ धावांची खेळी केली.  त्याने गुजरात लायन्स विरोधात ५३ धावा केल्या. 
 
लगेचच पुढच्या सामन्यात पंजाब विरोधात त्याने ६२ धावांची आयपीएलमधील आपली सर्वोच्च खेळी केली. मात्र त्यानंतर त्याचा फॉर्म हरपला. त्याची अवस्था सैरभैर झाली. पुढच्या सामन्यांमध्ये त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. संघ व्यवस्थपनाने त्याला बाद फेरीतून वगळले देखील. 
 
मात्र या एकाच सत्रात १७ षटकार आणि २४ चौकार ठोकणा-या या खेळाडूने आपल्या प्रतिभेने दिग्गजांना मोहित केले आहे. देशांतर्गत स्पर्धेत राणा दिल्लीकडून खेळतो. २०१५-१६ च्या सत्रात त्याने सैयद मुश्ताक अली स्पर्धेत २९९ धावा केल्या त्यात त्याने २१ षटकार ठोकले. त्यापैकी ८ षटकार ठोकत त्याने आंध्रविरोधात ४० चेंडूत ९७ धावांची खेळी केली होती.
 
२०१५-१६ च्या सत्रात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळताना त्याने ५०.६३ च्या सरासरीने ५५७ धावा केल्या होत्या. त्यात त्याने ३ अर्धशतके आणि शतक देखील झळकावले होते. दिल्लीकडून या सत्रात सर्वाधिक धावा काढणा- या खेळाडूंच्या यादीत तो अव्वल होता.

Web Title: IPL 10: Dhamdar Rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.