शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

आयपॅडच बनणार स्कोअरबुक!

By admin | Updated: November 12, 2014 00:35 IST

क्रिकेटचा चेहरामोहराच बदलला आहे. नव्याने आलेले ग्लॅमर, टी-ट¦ेंटी सामने, रंगीबेरंगी स्टंप या सा:या झळाळीमध्ये आता आणखी एक मोठी क्रांती बीसीसीआय घडवून आणत आहे.

शिवाजी गोरे - पुणो
क्रिकेटचा चेहरामोहराच बदलला आहे. नव्याने आलेले ग्लॅमर, टी-ट¦ेंटी सामने, रंगीबेरंगी स्टंप या सा:या झळाळीमध्ये आता आणखी एक मोठी क्रांती बीसीसीआय घडवून आणत आहे. या वर्षीपासून आयपॅड हेच चक्क स्कोअरबुक बनणार आहे. 
पूर्वी स्कोरबुकमध्ये हाताने स्कोअरिंग केले जायचे. त्यानंतर स्कोअरबुकची जागा लॅपटॉपने घेतली आणि आता या वर्षीपासून  आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.  देशांतर्गत क्रिकेट स्पर्धाच्या स्कोअरिंगसाठी प्रत्येकाच्या हातात आयपॅड दिसेल. बीसीसीआयच्या कार्यकारिणीने या महत्त्वपूर्ण निर्णयावर मंजुरीची मोहोर उमटविली आहे. बीसीसीआयअंतर्गत येणा:या पाच विभागांतील 15क् बीसीसीआय मान्यताप्राप्त स्कोअररना आयपॅड दिले गेले आहेत. 
स्कोअरसाठी हे आयपॅड वापरायचे कसे, याचे तीन दिवसांचे पाच विभागांतून खास प्रशिक्षण दिले गेले आहे. स्कोअरिंगसाठी एक विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. यामुळे स्कोरिंगमध्ये जलदपणा आणि अचूकता येईल. अचानक वीज गेली तरी स्कोअररचा खोळंबा होणार नाही. आयपॅड बॅटरीवर असल्याने स्कोअरर 8 ते 1क् तास बिनधास्तपणो काम करू शकणार आहे. ज्याप्रमाणो दूरदर्शनवर फलंदाजाने मारलेले चौकार, 
षटकार यांची माहिती व्हॅगन व्हीलद्वारे प्रेक्षकांना मिळते, तशी माहिती 
यामध्ये मिळेल आणि तीसुद्धा क्षणार्धात. त्यामुळे बीसीसीआयची वेबसाईटही अन्य वेबसाईटपेक्षा फास्ट होणार आहे. 
हे सर्व आयपॅड एका सव्र्हरला जोडले जाणार असून, ते सर्व एकमेकांना सिक्रोनाईज केले जाणार आहेत. त्यामुळे एखाद्या सामन्यासाठी जो कोणी स्कोअरर असेल, तो जेव्हा गोलंदाजाने चेंडू टाकल्यावर आयपॅडमध्ये एंट्री करेल, तेव्हा क्षणार्धात ती एंट्री बीसीसीआयच्या साईटवर दिसेल. असे अनेक नवीन-नवीन शोध या खास तयार केलेल्या आयपॅडमध्ये आहेत.  
 
आयपॅडचा वापर केल्याने बीसीसीआयच्या वेबसाईटवर एका क्षणात सामन्याचा धावफलक वाचकांना वाचायला मिळणार आहे.  पहिला प्रयोग बीसीसीआय देशाअंर्गत (डॉमिस्टिक) स्पर्धेच्या वेळी केला जाणार आहे. त्या वेळी या सॉफ्टवेअरची चाचणीसुद्धा होणार आहे.  देशांतर्गत होणा:या विविध क्रिकेट स्पर्धामध्ये एकूण 875 सामने होतात. या सर्व सामन्यांचे स्कोअरिंग आयपॅडवर होणार आहे. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे आयपॅड चेन्नईच्या एका कंपनीकडून तयार करून घेतले आहे. यावर बीसीसीआय गेल्या 14 वर्षापासून काम करीत होती. 
-रत्नाकर शेट्टी, बीसीसीआय सरव्यावस्थापक, गेम डेव्हलपमेंट 
 
लॅपटॉपपेक्षा आयपॅडने स्कोअरिंग सोपे झाले आहे. पूर्वी कनेक्टिव्हिटीसाठी आमचा खोळंबा होत असे. संपूर्ण स्कोअर म्यन्युअली करावा लागे. आता तसे नाही. काम  खूप सोपे झाले आहे.  आयपॅडमध्ये व्हॅगन व्हीलचासुद्धा उपयोग आम्हाला करता येईल. प्रत्येक सामन्याची माहिती आम्ही बॉल टू बॉल, फलंदाजाने चेंडू कोठे मारला हेसुद्धा वाचकांना व प्रेक्षकांना देणार आहोत.  
-विश्वास घोसाळकर, बीसीसीआय स्कोअरर 
 
आयपॅडमुळे स्कोअरिंग सोपे होणार आहे. लॅपटॉपवर स्कोअरिंग करताना इंटरनेटला लॉगिन करावे लागायचे. जर  लाईट गेली, तर आमचे काम ठप्प होत असे. गेल्या महिन्यात एका सामन्याच्या वेळी मी आयपॅड वापरलेसुद्धा. मला लॅपटॉपपेक्षा ते सोपे वाटले.
- केतकी नाईक, बीसीसीआय पॅनल स्कोअरर