शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पेनचॅक सिलॅट संघाला बसला आयओएचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 04:48 IST

भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) मंगळवारी आगामी आशियाई स्पर्धेच्या पेनचॅक सिलॅट संघाला खोटे कागदपत्र सादर केल्याच्या कथित प्रकरणी वगळले आहे.

नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) मंगळवारी आगामी आशियाई स्पर्धेच्या पेनचॅक सिलॅट संघाला खोटे कागदपत्र सादर केल्याच्या कथित प्रकरणी वगळले आहे. त्यानंतर राष्ट्रीय महासंघाने कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे.आयओएने ५ जुलै रोजी आशियाई स्पर्धेसाठी ५२४ खेळाडूंची यादी जाहीर केली होती. त्यात पेनसाक सिलाटच्या २२ खेळाडूंच्या नावाचा समावेश होता, पण आयओएने केवळ दोन सदस्यांना मान्यता दिली आहे. आशियाई स्पर्धेचे आयोजन इंडोनेशियातील दोन शहर जकार्ता व पालेमबँगमध्ये १८ आॅगस्टपासून होणार आहे.भारतीय पेनचॅक सिलॅट महासंघ (आयपीएसएफ) या निर्णयाने नाराज आहे. मान्यता मिळालेले दोन खेळाडू व उर्वरित २० खेळाडूंना सारखेच प्रमाणपत्र दिले होते, असे आयपीएसएफने म्हटले. आयपीएसएफचे सचिव मुफ्ती हामिद यासिन म्हणाले, ‘आयओएच्या अधिकाऱ्यांसह चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, आशियाई स्पर्धेसाठी तुमच्या केवळ दोन महिला खेळाडूंना पाठविण्यास मंजुरी देत आहोत.’यासिन पुढे म्हणाले, ‘आयओएने आम्हाला सांगितले, आयपीएसएफने दिलेले प्रमाणपत्र खरे नाहीत. पण, निवड झालेल्या दोन खेळाडूंचे प्रमाणपत्रही अन्य खेळाडू सहभागी झाले त्याच चॅम्पियनशिपचे आहेत.’आयपीएसएफने म्हटले की, आम्ही आयओएकडे स्पष्टीकरण मागितले, पण अद्याप स्पष्ट उत्तर मिळालेले नाही. महासंघाचे एक अधिकारी म्हणाले, ‘आम्ही कायदेशीर कारवाईबाबत विचार करीत आहोत. आमचे खेळाडू पदकाचे दावेदार आहेत. त्यांनी या खेळात कामगिरीत सातत्य राखले आहे.’