शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आयओए एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही - किरेन रिजीजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 03:43 IST

‘भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) २०२२ मध्ये होणाऱ्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही,’ असे केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : ‘भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) २०२२ मध्ये होणाऱ्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही,’ असे केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले. राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी हटवल्यानंतर आयओएने या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली.गेल्या आठवड्यात राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) बर्मिंगहॅम स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याचा निर्णय घेताना तीन नवीन खेळांचा समावेश करण्याची शिफारस केली होती. हा निर्णय भारतासाठी मोठा धक्का आहे. २०१८ मध्ये गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६४ पदके जिंकली होती आणि त्यापैकी १६ पदके नेमबाजांनी जिंकली होती. तथापि, रिजीजू यांनी त्यांचे मंत्रालय कोणताही निर्णय घेण्याआधी नेमबाजी महासंघ आणि आयओएशी विस्तृत चर्चा करेल.रिजीजू म्हणाले, ‘मी नेमबाजी महासंघाशी चर्चा केलेली नाही. जर बहिष्कार टाकायचा असेल तर तुम्हाला सरकारला विचारावे लागेल. कारण असे निर्णय एकतर्फी घेतले जाऊ शकत नाही. यावर योग्य सल्लामसलतीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल. हा आमच्या खेळाडूंच्या भविष्याचा आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. यात सर्व काही समाविष्ट आहे. आयओएने काही पावले उचलायला हवीत व आम्ही त्यांच्याशी याविषयी चर्चा करू.’२०३२ आॅलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाविषयी रिजीजू म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद पत्करणे हे कोणत्याही देशासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. आॅलिम्पिक, विश्वचषक अथवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याची सर्वांचीच इच्छा असते. तथापि, तुम्ही त्यासाठी तयार आहात का हा मुख्य प्रश्न आहे. आॅलिम्पिकचे आयोजन करण्यात एक राष्ट्र म्हणून आम्हाला अभिमान वाटेल यात शंकाच नाही. आम्ही सकारात्मक आहोत व आम्ही याबाबत आयओएशी चर्चा करू.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Indiaभारत