शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

International Tiger Day: ...म्हणून वाघाच्या बछड्याला दिलं हिमा दासचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 15:35 IST

मागील महिन्याभरात विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पाच सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बंगळुरू : मागील महिन्याभरात विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पाच सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हिमानं 20 दिवसांत विविध स्पर्धांमध्ये 200 ( चार) आणि 400 ( एक) मीटर शर्यतीत पाच सुवर्णपदकं जिंकली. 2018मध्ये 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. त्यानंतर तिनं आशियाई स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली. तिच्या या कामगिरीला सलाम करण्यासाठी आजच्या जागतिक व्याघ्र दिवसाचं औचित्य साधून बंगळुरू येथील बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातील एका वाघाच्या बछड्याचं नाव 'हिमा' असं ठेवण्यात आले आहे.

'हारना नहीं है हिमा'... जग जिंकण्यासाठी 'सुवर्णकन्ये'ला वाढवावा लागेल वेग, गाठावी लागेल 'ती' वेळ!

हिमानं पोजनान अ‍ॅथलेटिक्स ग्रां. प्री. स्पर्धेत ( 2 जुलै ) 23.65  सेकंद, कुटनो अ‍ॅथलेटिक्स मीट स्पर्धेत ( 7 जुलै) 23.97 सेकंद, झेक प्रजासत्ताक येथे क्लांदो अ‍ॅथलेटिक्स ( 13 जुलै ) स्पर्धेत 23.43 सेकंद आणि झेक प्रजासत्ताक येथीलच टबोर अ‍ॅथलेटिक्स मीट ( 18 जुलै) मध्ये 23.25 सेकंदांसह 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. हिमाचे पुढील लक्ष्य हे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे. ती म्हणाली,''या पाच सुवर्णपदकांनी ती हुरळून गेलेली नाही. कारण ही पाच सुवर्णपदके म्हणजे सराव होता, आता मला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकायची आहे.'' 

याआधीही बऩ्नेरघट्टा उद्यानात अस्वलांना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि महिला क्रिकेटपटू मिताली राज यांचे नाव देण्यात आले आहे. जागतिक स्पर्धेची पात्रता निश्चित करण्यासाठी हिमाला 200 मीटर शर्यतीत 23.02 सेकंद आणि 400 मीटर शर्यतीत 51.80 सेकंदाची पात्रता वेळ नोंदवावी लागणार आहे.  7 सप्टेंबर 2018 ते 6 सप्टेंबर 2019 या कालावधीत होणाऱ्या स्पर्धांमध्ये ही वेळ नोंदवून जागतिक स्पर्धेच तिकीट निश्चित करता येणार आहे आणि हिमाकडे आता महिन्याभराचा कालावधी आहे. 

टॅग्स :Hima Dasहिमा दासTigerवाघ